मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८) १. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१) २. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१) ३. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण

मातीचे हो मंगल तनमन

चैतन्याचे फिरे सुदर्शन

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते

श्रमशक्तीचे मंत्र बोलते

उद्योगाचे चक्र चालते

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट

सर्वांचे हो एकच मनगट

शक्तीचीही झडते नौबत

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

हस्त शुभंकर हवा एकदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. (०२)

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

४. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

५. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे- (०२)

६. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. चैतन्य

२. श्रम

३. उद्योग

४. उत्क्रांती

दीर्घउत्तर

उत्तर

१. कवी - किशोर पाठक

२. कवितेचा विषय - देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न

३. कवी आपल्या देशाचे वर्णन करताना अभिमानाने सांगतो, की या देशाच्या मातीवरती, या मायभूमीवरती आमचा अधिकार आहे. त्यामुळे, नव्या पिढीचे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू.

४. 'स्वप्न करू साकार' या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेद्वारे कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा व एकीचे बळ या मूल्यांचे महत्त्व ते स्पष्ट करत आहेत. देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण शेतीचा विकास करून संपन्न होऊया, उद्योगधंद्यांची भरभराट व्हावी म्हणून श्रमशक्ती खर्च करूया, एकात्मतेचा मंत्र जपूया आणि या विश्वाचे वैभव वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहूया असा संदेश ते देतात.

५. हे समूहगीत साध्या, सोप्या भाषेत देशातील शेतीसंस्कृती, श्रमांचे महत्त्व व एकता या मूल्यांवर भर देते. आपल्या देशाची भरभराट, विकास होवो असा शुभ विचार व्यक्त करतानाच आपण सर्वांनी या कार्यात पुढाकार घेऊया असा प्रयत्नवादी दृष्टिकोन कवी मांडतात. ही कविता उत्साही भाव व सकारात्मकता निर्माण करते. यमक साधणारी, तालबद्ध रचना असल्यामुळे ती लयीत गाता येते. सर्व देशवासियांना देश घडवण्याची प्रेरणा देणारी ही कविता मला फारच आवडते. 

६.

१. उत्साह

२. कष्ट, मेहनत

३. व्यवसाय

४. सावकाश होणारे ठोस बदल

shaalaa.com
स्वप्न करू साकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16.1: स्वप्न करू साकार - स्वाध्याय

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
पाठ 16.1 स्वप्न करू साकार
स्वाध्याय | Q २. आ.

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

श्रमशक्तीचे मंत्र- 


खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

हस्त शुभंकर - 


खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार-


आकृतिबंध पूर्ण करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।


या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.


कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.


पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

आकलन कृती

 १. जोड्या जुळवा. (०२)

क्र. 'अ' 'ब'
१. सुदर्शन चक्र शुभंकर
२. मंत्र शक्ती
३. नौबत चैतन्य
४. हस्त श्रमशक्ती

 

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण

मातीचे हो मंगल तनमन

चैतन्याचे फिरे सुदर्शन

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते

श्रमशक्तीचे मंत्र बोलते

उद्योगाचे चक्र चालते

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट

सर्वांचे हो एकच मनगट

शक्तीचीही झडते नौबत

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

हस्त शुभंकर हवा एकदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

१. कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे?

२. शेतातील धान्याला कशाची उपमा दिली आहे?

३. कवितेत आलेल्या खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. मंगल -

२. तन -

३. ललकार -

४. विभव -

४. खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा. (०२)

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।


खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट।
सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘फुलामुलांतून हसतो श्रावण।
मातीचे हो मंगल तनमन।।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) संपदा -
(ii) बळकट - 
(iii) उत्क्रांती - 
(iv) चैतन्य -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) शुभंकर -
(ii) उज्जवल -
(iii) विभव -
(iv) अमुचा -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) ललकारणे -
(ii) नौबत - 
(iii) विभव - 
(iv) श्रम - 

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - 

‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’

(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) विभव -
(ii) शक्ती -
(iii) विश्‍व -
(iv) हस्त -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×