Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. | ‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’ |
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) ललकारणे - |
(ii) नौबत - | |
(iii) विभव - | |
(iv) श्रम - |
उत्तर
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | कवी - किशोर पाठक |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - | भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. |
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. | कवी आपल्या देशाचे वर्णन करताना अभिमानाने सांगतो, की या देशाच्या मातीवरती, या मायभूमीवरती आमचा अधिकार आहे. त्यामुळे, नव्या पिढीचे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू. |
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | ‘स्वप्न करू साकार’ ही कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण कवितेच्या सुरुवातीलाच कवीने नव्या पिढीच्या व नव्या युगाच्या मनात देशाप्रती आपलेपणाची भावना जागृत केलेली आहे. त्यानंतर या आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे. पण केवळ प्रेरणा देऊनच ते थांबले नाहीत तर देशाच्या उन्नतीचा मार्गही म्हणजेच कृषिविकास, उदयोग क्षेत्रातील विकास, संस्कृतीचे जतन-संवर्धन त्यांनीच समजावून सांगितला आहे. त्यासाठी एकोप्याने काम करायला हवे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. हे सर्व आपण मनापासून केले तर नव्या पिढीचे, नव्या युगाचे आपल्या उज्ज्वल भारत देशाचे स्वप्न पूर्ण होईल असा सुंदर आशावाद त्यांनी मांडला आहे. |
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) ललकारणे - पुकारणे, जयघोष करणे |
(ii) नौबत - डंका, मोठा नगारा, स्थिती | |
(iii) विभव - ऐश्वर्य, भाग्य, संपत्ती | |
(iv) श्रम - कष्ट, काम |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.
श्रमशक्तीचे मंत्र-
खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.
हस्त शुभंकर -
खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार-
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।
या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.
कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.
खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।
कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।। फुलामुलांतून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तनमन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।। या हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाचे चक्र चालते आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।। हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीचीही झडते नौबत घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।। या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा हस्त शुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।। |
१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)
२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)
३. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. (०२)
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।
४. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)
५. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे- (०२)
६. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. (०२)
१. चैतन्य
२. श्रम
३. उद्योग
४. उत्क्रांती
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | 'स्वप्न करू साकार' |
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'हजार आम्ही एकी बळकट। सर्वांचे हो एकच मनगट।।' |
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. विभव - ii. मंगल - iii. श्रम - iv. हस्त - |
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘फुलामुलांतून हसतो श्रावण। मातीचे हो मंगल तनमन।।’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) संपदा - |
(ii) बळकट - | |
(iii) उत्क्रांती - | |
(iv) चैतन्य - |
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) शुभंकर - |
(ii) उज्जवल - | |
(iii) विभव - | |
(iv) अमुचा - |
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- शक्तीचीही झडते - ______
- चैतन्याचे फिरे - ______
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार फुलामुलांतून हसतो श्रावण या हातांनी यंत्र डोलते हजार आम्ही एकी बळकट या विश्वाची विभव संपदा |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- बळकट -
- आभाळ -
- संपदा -
- अपरंपार -
४. काव्यसौंदर्य: (2)
‘घराघरांतून जन्म घेतले तेज नवा अवतार।’ या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
कृती | ‘स्वप्न करू साकार’ |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - |
‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’ |
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ - | (i) विभव - |
(ii) शक्ती - | |
(iii) विश्व - | |
(iv) हस्त - |