मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

ΔPQR असा काढा की PQ - PR = 2.4 सेमी, QR = 6.4 सेमी आणि ∠PQR = 55°. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ΔPQR असा काढा की PQ - PR = 2.4 सेमी, QR = 6.4 सेमी आणि ∠PQR = 55°.

बेरीज

उत्तर

कच्ची आकृती:

स्पष्टीकरण:

PQ - PR = 2.4 सेमी

∴ PQ > PR

QR हा रेषाखंड काढू. रेख QR शी 55° कोन करणारा किरण QT काढता येतो.

त्या किरणावर S बिंदू शोधायचा आहे. QS = 2.4 सेमी असा S बिंदू त्या किरणावर घेतला.

आता, PQ – PS = QS    ...[Q-S-P]

∴ PQ – PS = 2.4 सेमी      ...(i)

तसेच, PQ – PR = 2.4 सेमी    ...(ii) [दिलेले]

∴ PQ – PS = PQ – PR    ...[(i) आणि (ii) वरून]

∴ PS = PR

∴ बिंदू P हा रेख RS च्या लंबदुभाजकावर आहे.

∴ बिंदू P हा किरण QT चा छेदनबिंदू आहे आणि रेख RS चा लंबदुभाजक आहे.

रचनेच्या पायऱ्या:

  1. रेख QR हा 6.4 सेमी काढा.
  2. Q बिंदूपाशी 55° कोन करणारा किरण QT काढा.
  3. किरण QT वर D बिंदूअसा घ्या की QS = 2.4 सेमी.
  4. रेख SR काढून त्याचा लंबदुभाजक काढा.
  5. रेख SR चा लंबदुभाजक किरण QT ला जेथेछेदतो त्या बिंदूला P नाव द्या.
  6. रेख PR काढा.

ΔPQR हा अपेक्षित त्रिकोण आहे.

shaalaa.com
त्रिकोण रचना - त्रिकोणाचा पाया, उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक आणि पायालगतचा एक कोन दिला असता त्रिकोण काढणे.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: त्रिकोण रचना - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [पृष्ठ ५६]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 4 त्रिकोण रचना
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q 4. | पृष्ठ ५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×