मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील समारंभाची बातमी तयार करा. शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील समारंभाची बातमी तयार करा.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

थोडक्यात उत्तर

उत्तर

लोकराज्य

जनता विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव उद्घाटन समारंभ :

मा. शिक्षणमंत्र्यांची उपस्थिती

दि. २६ मार्च २०२१

वार्ताहर, मुंबई: येथील विजयनगर विभागातील जनता विद्यालयाचे २०२०-२१ हे सुवर्ण-महोत्सवी वर्ष असून त्याचा उद्घाटन समारंभ दि. २६ मार्च रोजी मा. शिक्षणमंत्री बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मा. शिक्षणमंत्री बबनराव शिंदे यांच्यासह या विभागाचे आमदार राजन देशमुख आणि शाळेचे अनेक माजी विद्यार्थी हजर होते. शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेकडून केले गेले आहे, याची माहितीपुस्तिका या प्रसंगी प्रकाशित केली गेली. शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी उद्घाटन प्रसंगी म्हटलेले स्वागतगीत हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. माननीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. शिर्के सर यांनी साऱ्या निमंत्रित पाहुण्यांचे, आजी-माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि वर्षभर हा महोत्सव सुरू राहणार असून त्यात साऱ्याचा सहभाग हवा असे आवाहन केले.

shaalaa.com
बातमी लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20.3: उपयोजित लेखन - बातमी लेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
पाठ 20.3 उपयोजित लेखन
बातमी लेखन | Q २.
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
पाठ 16.3 उपयोजित लेखन
स्वाध्याय | Q २.

संबंधित प्रश्‍न

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.

खालील विषयावर बातमी तयार करा.

रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:


पुढील विषयावर बातमी तयार करा.

जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.


दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.

शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.


पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.

कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.


पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.

बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, नागपूर
‘भव्य विज्ञान प्रदर्शन’ संपन्न.
दि. 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर
वेळ स. 11 ते सं. 5 वाजेपर्यंत
अध्यक्ष - श्री. सुहास माने
प्रमुख पाहुणे - श्री. आशिष वाघ

  • एकूण 50 शाळांचा सहभाग
  • उद्घाटन सोहळा संपन्न
  • उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके
  • विज्ञान नाटिका सादर

वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला.

या समारंभाची बातमी तयार करा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

आदर्श विद्यालय

रवीनगर, गडचिरोली

‘विज्ञानदिन सोहळा’

विज्ञानदिनानिमित्त

वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख

सिटी कॉलेज, गडचिरोली

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.

विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे.

खालील मुद्द्यांवरून बातमी तयार करा.

आदर्श शिक्षक पारितोषिक सोहळा

शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर शाळेतर्फे

आदर्श आणि गुणी शिक्षकांचा सत्कार

  • प्रमुख पाहुणे: कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
  • स्थळ: विद्या मंदिर शाळा, कात्रज, पुणे.
  • वेळ: दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत
  • दिनांक: ५ सप्टेंबर, २०१७

तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.


खालील विषयावर बातमी तयार करा.

8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.


खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.


खालील विषयावर बातमी तयार करा:

जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.

प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे

अध्यक्ष - श्री. सागर शिंदे

दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00


खालील विषयावर बातमी तयार कराः

'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.


खालील विषयावर बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, सोलापूर
शालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी
'शुभेच्छा समारंभ'

दि. 25 फेब्रुवारी,  वेळ - ११:०० वा.

अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी

प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×