Advertisements
Advertisements
प्रश्न
‘अ’ गट | ‘ब’ गट | |
1 | सूर्याचा उदय झाला. | सूर्योदय झाला. |
2 | प्रत्येक दिवशी त्याची प्रतिष्ठा वाढत गेली. | दिवसेंदिवस त्याची प्रतिष्ठा वाढत गेली. |
बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्परसंबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला ‘समास’ असे म्हणतात. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो जोडशब्द तयार होतो त्याला ‘सामासिक शब्द’ म्हणतात.
समास विग्रह - सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला, हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करताे. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला ‘विग्रह’ म्हणतात. वर ‘ब’ गटात सामासिक शब्द आहेत, तर ‘अ’ गटात विग्रह आहेत.
उत्तर
सामासिक शब्द | विग्रह | |
1 | सूर्योदय | सूर्याचा उदय |
2 | दिवसेंदिवस | दिवसांमागून दिवस |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
व्याकरण.
खालील तक्ता पूर्ण करा.
सामासिक शब् | समासाचा विग्रह | समासाचे नाव |
(१) पंचमहाभूत | ____________ | ____________ |
(२) परमेश्वर | ____________ | ____________ |
(३) शब्दप्रयोग | ____________ | ____________ |
(४) शेजारीपाजारी | ____________ | ____________ |
(५) विजयोन्माद | ____________ | ____________ |
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | सामासिक शब्द |
समासाचा विग्रह |
समासाचे नाव |
(१) |
______ |
सहा मासांचा (महिन्यांचा) समूह |
______ |
(२) |
ग्रंथालय |
____________ |
______ |
(३) |
______ |
____________ |
कर्मधारय |
(४) |
त्रिदल |
____________ |
______ |
(५) |
______ |
बालकांसाठीचे मंदिर |
______ |
(६) |
नरश्रेष्ठ |
____________ |
______ |
(७) |
______ |
____________ |
विभक्ती तत्पुरुष |
खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.
[यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष]
द्विगू | अव्ययीभाव समास | वैकल्पिक द्वंद्व समास | इतरेतर द्वंद्व समास | समाहार द्वंद्व समास |
खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.
सामासिक शब्द | विग्रह | विभक्ती |
(अ) सभागृह | सभेसाठी गृह | ______ |
(आ) कलाकुशल | कलेत कुशल | ______ |
(इ) ग्रंथालय | ग्रंथांचे आलय | ______ |
(ई) कष्टसाध्य | कष्टाने साध्य | ______ |
(उ) रोगमुक्त | रोगापासून मुक्त | ______ |
खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.
सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.
खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.
प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.
महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे.
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
काव्यामृत - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
द्विदल - ______
खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.
कष्टाची मीठभाकर आयत्या पक्वानापेक्षा गोड लागते - ______
खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.
सभेला चारपाच माणसेच उपस्थित होती - ______
खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा आपण विग्रह व समासाचे नाव असा अभ्यास करावा.
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
नीलकमल | ||
महाराष्ट्र | ||
भाषांतर | ||
पांढराशुभ्र | ||
घननीळ | ||
शामसुंदर | ||
कमलनयन | ||
नरसिंह | ||
विद्याधन | ||
रक्तचंदन | ||
घनश्याम | ||
काव्यामृत | ||
पुरुषोत्तम | ||
महादेव |
खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा.
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
पंचारती | ||
त्रिभुवन | ||
नवरात्र | ||
सप्ताह | ||
अष्टाध्यायी | ||
पंचपाळे | ||
द्विदल | ||
बारभाई | ||
त्रैलोक्य |
योग्य जोड्या लावा.
सामासिक शब्द | समासाचे नाव |
1) भाजीपाला | अ. कर्मधारय समास |
2) पुरुषोत्तम | ब. इतरेतर द्वंद्व समास |
क. समाहार द्वंद्व समास |
खालील तक्ता पूर्ण करा.
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
आईवडील | ||
नवरात्र |
पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.
सद्गुरू
पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.
चौघडी
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
सामासिक शब्द | विग्रह |
भाजीपाला | ______ |