मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही चार कारणे स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही चार कारणे स्पष्ट करा.

शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा.

स्पष्ट करा

उत्तर

सार्वजनिक खर्च म्‍हणजे केंद्रशासन, राज्‍य शासन आणि स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्‍यांच्या सामुहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्‍याणासाठी केलेला खर्च म्‍हणजे सार्वजनिक खर्च होय.

खालील कारणांमुळे भारतासारख्या विकसनशील देशात सार्वजनिक खर्चात सतत वाढ होत आहे:

  1. शासनाच्या कार्यात वाढ: शिक्षण प्रसार, सार्वजनिक आरोग्‍य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाजकल्‍याणकारी योजना इत्‍यादी बाबींचा या कार्यात समावेश होतो. यावरून असे आढळून येते की, शासन सातत्‍याने नवनवीन कार्ये स्‍वीकारत आहे आणि जुनी कार्ये अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार पाडत आहे. यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते.
  2. लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ: भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार ती लोकसंख्या १२१.०२ कोटी इतकी होती. परिणामी, वाढत्‍या लोकसंख्येच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी शासनाला अधिक खर्च करावा लागतो.
  3. वाढते शहरीकरण: वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे. यामुळे पाणीपुरवठा, रस्‍ते, ऊर्जा, शाळा व महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक, स्‍वच्छता इत्‍यादींवरील शासनाच्या खर्चात वाढ होते.
  4. संरक्षण खर्चात वाढ: आधुनिक काळात अस्‍थिर व असमंजस आंतरराष्‍ट्रीय संबंधांमुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो.
  5. लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार: जगातील बहुसंख्य देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. नियमित निवडणुका व इतर बाबींमुळे लोकशाही शासनपद्धती खर्चीक ठरते. त्‍यामुळे शासनाच्या एकूण खर्चात सतत वाढ होत जाते.
  6. भाववाढ: एखाद्या खाजगी व्यक्‍तीप्रमाणेच आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्‍तू व सेवांची खरेदी करावी लागते. सर्वसाधारणपणे किंमतवाढीची प्रवृत्‍ती दिसून येते, त्‍यामुळे शासनाला वाढीव खर्च करावा लागतो.
  7. औद्योगिक विकास: औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्‍थेत उत्‍पादनवाढ, रोजगारवाढ व एकूण वृद्धी घडून येते. म्‍हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्‍न करते. त्‍यात विविध योजना आणि कार्यक्रमांवर खर्च करते. परिणामी, एकूण खर्चात वाढ होते.
  8. आपत्‍ती व्यवस्‍थापन: अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता, अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्‍ती वारंवार घडून येताना दिसत आहेत. त्‍यामुळे शासनाला आपत्‍ती व्यवस्‍थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी, एकूण खर्चात वाढ होते. आधुनिक शासन कल्‍याणकारी राज्‍यासाठी कार्य करते. त्‍यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे अपरिहार्य आहे.
shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक खर्च
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×