Advertisements
Advertisements
प्रश्न
स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. उदा. एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढउतार, व्यवसायातील चढउतार इत्यादी.
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- समग्र घटकांचा अभ्यास: स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदा. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापारचक्र इत्यादी.
- उत्पन्न सिद्धान्त: स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापनपद्धती आणि सामाजिक लेखांकनांचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ-उतार, व्यापारचक्रातील तेजी-मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते.
- सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण: स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे.
- परस्परावलंबन: स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले उदा. उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमतपातळी यांसारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदा., गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम, उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो.
- राशी पद्धत: राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्रा. बोल्डिंग यांच्या मते, “जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो; परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत.” यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांमधील फरक दर्शविला जातो.
- वृद्धीची प्रारूपे: स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात.
- सर्वसाधारण किंमत पातळी: स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्य स्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय.
- धोरणाभिमुख: लॉर्ड केन्स यांच्या मते, “स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविण्याऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे.” उदा., भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी.
shaalaa.com
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?