Advertisements
Advertisements
प्रश्न
शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात.
- शेती अवजारे, बी-बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई-म्हशींचे संगोपन, दुग्धव्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते.
- जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम (वेअर हाउस) बांधणीसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.
- पीक विमा संरक्षण, उत्पादित मालाची खरेदी इत्यादी बाबींमध्ये सरकार शेतकऱ्यांना मदत करते.
shaalaa.com
भारतातील काही उद्योग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारतातील ______ उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.
वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ______ हे आहे.
सायकल उत्पादनात ______ हे भारतातील प्रमुख शहर आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.
पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?
भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात?