Advertisements
Advertisements
प्रश्न
'सजलेधजले' अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा.
(अ) कामधाम
(आ) पुरणपोळी
उत्तर
आणखी काही जोडशब्द:
(इ) भाजीपाला
(ई) केरकचरा
(उ) भांडीकुंडी
(ऊ) घरोघरी
(ए) पाऊसपाणी.
संबंधित प्रश्न
खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी.
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.
चुकीची शिस्त-
खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.
उदा.,
- तुषार गुणी आहे.
- तो पिवळा चेंडू खेळतो.
- तुषारला मिठाई आवडते.
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
तार - तारा
खालील शब्दाचे लिंग बदला.
नाग -
खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.
खालील वाक्यात योग्य नामे लिहा.
माझ्या दप्तरात ______, ______, ______ या वस्तू आहेत.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.
अरेरे त्याच्याबाबतीत फारच वाईट झाले
आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.
शरीर अवयवावर आधारित | प्राणी व पक्षी यांवर आधारित | मानवी भावभावना | अन्नघटक | इतर घटक | |
(१) | चेहरा काळवंडणे. | पोटात कावळे ओरडणे. | जिवाची उलघाल होणे. | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. | दगडापेक्षा वीट मऊ. |
(२) | |||||
(३) | |||||
(४) | |||||
(५) |
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आभार-अभिनंदन