Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
जमातवाद
टीपा लिहा
उत्तर
- जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील एक गंभीर आव्हान आहे. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. आपल्या देशात विविध धर्मांचे लोक शतकानुशतकापासून गुण्यागोविंदाने राहत आले आहेत.
- एखाद्या समाजात भिन्न-भिन्न धर्मांच्या लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणे यात वावगे काहीच नाही. पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुरभिमानात झाल्यावाचून राहत नाही. प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे सर्व तुच्छ वाटतात.
- धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे, माणसांकडे बघण्याची दृष्टीच कलुषित होऊन जाते. ाही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचारही आपापल्या धर्माच्या चौकटीतूच करू लागतात. आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणात प्रभावशून्य आहोत असे सर्वच धर्मांतील काही व्यक्तींना वाटत.
- आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोलले किंवा धार्मिक प्रतीकांचा कळत-नकळत कोणी अपमान केला तर यातूनच दंगली पेटतात.
shaalaa.com
जमातवाद
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?