Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
प्रदेशवाद
टीपा लिहा
उत्तर
- ‘प्रदेशवाद’ म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय. उदा., मी बंगाली, मी मराठी अशी आपली ओळख सांगणे वेगळे; पण मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा अवाजवी प्रांताभिमान झाला. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे - पण त्याचे विकृतीकरण नसावे.
- विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली तर इतर राज्ये आर्थिकदृष्ट्या मागासच राहिली. उदा., महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तमिळनाडू ही राज्ये आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली; तर ओडिशा, बिहार, आसामसारखी राज्ये आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली.
- प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे, असा श्रेष्ठत्वाचा गंड विकसित राज्याच्या लोकांमध्येनिर्माण होतो व मग ते अविकसित राज्यांतील लोकांना कमी लेखू लागतात.
shaalaa.com
प्रदेशवाद
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?