English

AB = 6 सेमी, ∠BAQ = 50°. A व B मधून जाणारे वर्तुळ असे काढा, की AQ ही वर्तुळाची स्पर्शिका असेल. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

AB = 6 सेमी, ∠BAQ = 50°. A व B मधून जाणारे वर्तुळ असे काढा, की AQ ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.

Sum

Solution

कच्ची आकृती

विश्लेषण:

आकृतीत दर्शवल्याप्रमाणे, C हे वर्तुळाचे केंद्र आहे.

∴ ∠QAC = 90° …....[स्पर्शिका त्रिज्येला लंब असते.]

∴ वर्तुळाचे केंद्र किरण AC वर असले पाहिजे व ते बिंदू A आणि B पासून समान अंतरावर असायला पाहिजे.

∴ वर्तुळाचे केंद्र म्हणजेच बिंदू C हा रेख AB चा लंबदुभाजक व किरण AC चा छेदनबिंदू असेल. 

रचनेच्या पायऱ्या: 

  1. 6 सेमी लांबीची रेख AB काढा.
  2. किरण AQ अशाप्रकारे काढा, ∠BAQ = 50°
  3. किरण AD अशाप्रकारे काढा, की ∠QAD = 90°
  4. रेख AB चा लंबदुभाजक काढा. हा किरण AD ला बिंदू C मध्ये छेदेल.
  5. केंद्र C व त्रिज्या AC घेऊन वर्तुळ काढा.  
shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: भौमितिक रचना - Q ५)

APPEARS IN

SCERT Maharashtra Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC
Chapter 4 भौमितिक रचना
Q ५) | Q ५)

RELATED QUESTIONS

केंद्र M व त्रिज्या 3.4 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा. 


रेख AB = 6.8 सेमी काढा. रेख AB व्यास असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर A व B व्यतिरिक्त बिंदू C घ्या. रेख AC व रेख CB काढा. ∠CAB चे माप लिहा. 


P केंद्र असलेले वर्तुळ काढा. कंस AB हा 100° काढा. A व B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालील कृती करा. 

कोणतीही त्रिज्या व P केंद्र घेऊन वर्तुळ काढा.
वर्तुळावर कोणताही एक बिंदू A घ्या.
किरण PB असा काढा की ∠APB = 100° 
किरण PA ला A मधून लंब रेषा काढा.
किरण PB ला B मधून लंब रेषा काढा.

C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.  

C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा.
आरंभबिंदू C असणाऱ्या किरणावर 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या.
रेख BC चा लंबदुभाजक काढून मध्यबिंदू P मिळवा.
P केंद्र व त्रिज्या CP घेऊन वर्तुळ काढा. दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूस A व D नाव द्या.
रेषा BA व रेषा BD काढा.

स्पर्शिकाखंड BA = ______ सेमी

स्पर्शिकाखंड BD = ______ सेमी


C केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील P बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


O केंद्र व 3 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रातून जाणाऱ्या छेदिकेवर वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध बाजूस वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावर बिंदू P व बिंदू P घ्या. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


ΔABC असा काढा, की AB = 8 सेमी, BC = 6 सेमी, ∠B = 90°. रेख BD हा कर्ण AC ला लंब काढा. बिंदू B, D व A मधून जाणारे वर्तुळ काढा. तसेच रेषा BC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे याचे स्पष्टीकरण द्या.


३ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. चौरसाची प्रत्येक बाजू वर्तुळाला स्पर्श करेल असा चौरस काढा.


3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळाला दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या एकमेकींना लंब असतील.


बिंदू P हा रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. बिंदू P मधून जाणारे 4 सेमी त्रिज्येचे असे वर्तुळ काढा, की रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका असेल. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×