Advertisements
Advertisements
Questions
बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक स्पष्ट करा.
बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक थोडक्यात लिहा.
Solution
'जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे' या युक्तीनुसार मनुष्य जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे मनुष्य स्वभावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येते. बातमी हा आपल्या आयुष्यातला अपरिहार्य घटक बनला आहे. बातमीत घडलेली घटना जशीच्या तशी सांगण्यावर विशेष लक्ष असते. वस्तुनिष्ठता हा बातमी विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीत महत्त्वाचे असते. बातमीत 'मी' असत नाहीत. घटनेचे वास्तवदर्शी रूप बातमी दाखवत असते. बातमी एखाद्या घटना/प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते. वृत्तलेख बातमीच्या पलीकडे असणारी बातमी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. बातमी न आलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती वृत्तलेखात वाचावयास मिळते. बातमीतील घटनेमागे असणारे सूक्ष्म धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न वृत्तलेखात केला जातो. वृत्तलेख बातमीच्या पायावर उभा असला, तरी वृत्तलेखाचे रूप लालित्यपूर्ण असते. काल्पनिकता नसली तरी बातमीतील अस्पर्शित नोंदी विस्तृतपणे चित्रित केल्या जातात.
RELATED QUESTIONS
वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर लिहा.
वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची गरज.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाचे स्रोत.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची भाषा
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची वैशिष्ट्य.
वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा
बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
वृत्तलेखाची लेखनशैली कशी असावी? ते तुमच्या भाषेत लिहा.
वृत्तलेखाची कोणतीही पाच वैशिष्ट्ये लिहा.
त्यातील मजकूर ______ त्याची आकर्षकता ______ वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी ______ आपलीशी वाटणारी ______ कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी ______ वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी.
‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा.
‘वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते’ तुमचे मत लिहा.
व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना तयार करा.
वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा.
वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे ............. वृत्तलेखाची शैली.
वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
बातमीवर आधारित वृत्तलेख ______ व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख ______ मुलाखतीवर आधारित वृत्ललेख ______ ऐतिहासिक स्थळ ______ गूढ, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख.