English

वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. बातमीवर आधारित वृत्तलेख ______ व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख ______ मुलाखतीवर आधारित वृत्ललेख ______ ऐतिहासिक स्थळ - Marathi

Advertisements
Advertisements

Question

वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

बातमीवर आधारित वृत्तलेख ______ व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख ______ मुलाखतीवर आधारित वृत्ललेख ______ ऐतिहासिक स्थळ ______ गूढ, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख.

Long Answer

Solution

  1. बातमीवर आधारित वृत्तलेख: जी बातमी वर्तमानपत्रात छापून आलेली असते, तिच्यातील सर्व माहिती वृत्तलेखात नसते. तर त्या बातमीतील महत्त्वाच्या मुद्‌द्यांवर अशा वृत्तलेखात प्रकाश टाकला जातो. वृत्तलेखात त्या बातमीतील मुद्‌द्यांचे विश्लेषण केले जाते. लिहिणाऱ्याकडे त्या विषयाच्या संदर्भाने असलेली ताजी, स्वतंत्र माहिती असते. अनेकदा वृत्तलेख लिहिताना तज्ज्ञांशी बोलून, घटनेचा तळ गाठून लेखन करावे लागते. त्यामुळे वाचकांना नवे काही मिळाल्याचा आनंद असतो. वृत्तलेखासाठी विषयाच्या मर्यादा नसतात. तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शहरी, ग्रामीण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय अशा विविध विषयांवर लिहिला जाऊ शकतो. उदा., पर्यावरण, दिल्लीतील वाढते प्रदूषण- कारणे आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम.
  2. व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख: अशा प्रकारच्या लेखात जसे असामान्य कर्तृत्व असलेल्या व्यक्तीवर लिहिले जाते तसेच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण कार्य असलेल्या सामान्य माणसाबद्दलदेखील लिहिले जाऊ शकते. एखाद्या क्षेत्रात मिळवलेले देदीप्यमान यश, केलेला संघर्षव प्रयत्नांची पराकाष्ठा, एखाद्या समस्येवर मात करताना केलेला उपक्रम, कृती, केलेला विक्रम या संदर्भात वृत्तलेख लिहिले जातात. औचित्य साधून या प्रकारचे लेख लिहिले जातात. अनेकदा व्यक्तीला मिळालेला पुरस्कार, गौरव, वाढदिवस, अमृतमहोत्सव, जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंगी व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिला जाताे. 
  3. मुलाखतीवर आधारित वृत्ललेख: विविध क्षेत्रात वेगवेगळे लोक स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत असतात. प्रसारमाध्यमांसाठी त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्या मुलाखतीचा भाग लेख स्वरूपात वृत्तपत्रात प्रकाशित केला जातो. या लेखातून व्यक्तीच्या कर्तृत्वाची बाजू, संशोधन, मतप्रणाली, त्यांचा दृष्टिकोन, त्यांनी निवडलेले क्षेत्र, एखादा अविस्मरणीय प्रवास, स्वतःच्या क्षेत्रात मिळवलेले अभूतपूर्व यश, अनुभव या संदर्भाने त्यात मांडणी केली जाते. सर्वसाधारण लोकांना जे माहीत आहे त्यापेक्षा वेगळे काही मांडण्याचा प्रयत्न या प्रकारच्या लेखात केला जातो. उदा., गिर्यारोहक, संशोधक, नामवंत लेखक, कवी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्या मुलाखतींवर आधारित लेख इत्यादी.
  4. ऐतिहासिक स्थळ: गावे, स्थळे, वास्तू यांना ऐतिहासिक संदर्भ असतात. काही ठिकाणी संशोधन करताना उत्खनन होत असते. संशोधनाच्या माध्यमातून जुनी कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट आदी संदर्भात नवनवीन माहिती समोर येत असते. अनेकदा संशोधक जुन्या माहितीच्या संदर्भात संशोधनात्मक अभ्यासातून एखाद्या वास्तू किंवा स्थळावर प्रकाशझोत टाकत असतात. त्या नव्या माहितीच्या संदर्भात प्राचीन माहितीचा उपयोग करून लेख लिहिता येतो. ग्रामीण पंरपरेतील लोकसाहित्याच्या संदर्भांचा अभ्यास करून मांडणी करता येते. लिहिणारी व्यक्ती त्या स्थळाला भेट देते. त्याने जे पाहिले, अनुभवलेत्या बाबतीत तो वृत्तलेख लिहिला जातो. उदा., अहमदनगर शहर, भुईकोट किल्ला, शनिवार वाडा, हेमाडपंथीय मंदिरांचे शिल्पकाम इत्यादी.
  5. गूढ, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख: एखादी विस्मयकारक घटना, कृती, निसर्गातील नवलाई यासंबंधीच्या अनुभवांवर आधारित हा लेख असतो. एखाद्या परिसरातील निसर्गाचे दृश्य हा जसा वृत्तलेखाचा विषय ठरतो त्याप्रमाणे एखादे गूढ, निसर्गातील एखादा चमत्कार हा देखील वृत्तलेखाचा विषय ठरतो. मात्र यासंबंधी लेखन करताना आपण ज्यावर लिहीत आहोत त्या संबंधीची शहानिशा करणे, त्या संदर्भातील माहिती पारखून घेणे, चिकित्सा करणेआवश्यक ठरते. यामधील माहितीची विश्वासार्हता महत्त्वाची असते. उदा., सांगलीत नदीच्या महापूराच्या पाण्याची पातळी ५८ फूट, हिमालयातील निसर्ग, रांजणखळगे, मोठा अपघात होऊनही एखाद्या बालकाचा प्राण वाचणे.
shaalaa.com
वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.


बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक स्पष्ट करा.


वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर लिहा.


वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची गरज.


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाचे स्रोत.


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची वैशिष्ट्य.


वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा


बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.


वृत्तलेखाची लेखनशैली कशी असावी? ते तुमच्या भाषेत लिहा.


वृत्तलेखाची कोणतीही पाच वैशिष्ट्ये लिहा.

त्यातील मजकूर ______ त्याची आकर्षकता ______ वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी ______ आपलीशी वाटणारी ______ कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी ______ वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी.


‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा.


‘वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते’ तुमचे मत लिहा.


व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना तयार करा.


वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा.

वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे ............. वृत्तलेखाची शैली.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×