English

दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा.

Answer in Brief

Solution

  1. दशावतारी नाटक हा महाराष्ट्रातील एक लोकनाट्य प्रकार आहे
  2. या नाटकांचा आधार मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, आणि कल्की या दहा अवतारांवर असतो.
  3. या नाटकांचे प्रयोग मुख्यतः सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे होतात. दशावतारी नाटकांच्या सादरीकरणात सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करून नाटकाची सुरुवात करतो.
  4. नाटकाचा बहुतांश भाग पद्य रूपात असतो, आणि काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. या नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा सर्वात परंपरागत असतो. देवाची भूमिका सादर करणारी पात्रे लाकडी मुखवटे वापरतात.
  5. दशावतारी नाटकाचा शेवट हंडी फोडून दहिकाला वाटणे आणि आरती करून होतो.
shaalaa.com
लोकनाट्य
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×