Advertisements
Advertisements
Question
पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
Explain
Solution 1
- पोवाडा हा एक गद्यपद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. पोवाड्यामध्ये शूर स्त्री-पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त व स्फूर्तिदायक भाषेत कथन केले जाते.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास या कवीने अफझलखान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासाने रचलेला सिंहगडच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे.
- ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक, चापेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले.
- संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली.
shaalaa.com
Solution 2
- घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे 'पोवाडा' होय.
- पोवाडा हा गद्य-पद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.
- तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे.
- पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते.
- लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो.
- दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.
shaalaa.com
लोकनाट्य
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ________ यांना मानतात.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
पुढील तक्ता पूर्ण करा.
भजन | कीर्तन | लळित | भारुड | |
गुणवैशिष्ट्ये | ||||
उदाहरणे |
पुढील तक्ता पूर्ण करा:
ललित | भारूड | |
गुणवैशिष्ट्ये | ||
उदाहरणे |
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा.