Advertisements
Advertisements
Question
‘हिवाळ्यातील एक क्षण’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
Solution
आम्ही कुटुंबासह गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चारधाम यात्रेवर गेलो होतो. गंगोत्रीच्या काठाजवळ आम्ही तात्पुरती वस्ती केली होती. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणची सविस्तर माहिती नसल्यामुळे, सकाळी उठल्यावर बाहेरील थंडीत मी उबदार शाल घालून बाहेर पडलो. गच्च धुक्याची चादर पांघरलेली झाडे नि गंगेच्या किनाऱ्यावर बर्फांची ओढणी अंथरलेले दृश्य दिसले. ऑक्टोबर असल्यामुळे पर्वतांवरील बर्फ वितळले होते, परंतु उंच शिखरांवर अजूनही बर्फाचे ढीग होते. मी त्या दृश्याचा आनंद घेत होतो, तेव्हा एक सूर्याचा किरण शिखरावर पडला नि तिथला बर्फ सोन्याच्या रंगाने चमकला. हे अद्भुत दृश्य केवळ काही क्षणांसाठी उमटले आणि लगेचच नाहीसे झाले. हा अविस्मरणीय हिवाळ्यातील क्षण मी कधीही विसरू शकत नाही.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे लिहा.
लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे -
तुलना करा.
भारतामधील धुके | लंडनमधील धुके |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
(४) | (४) |
इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.
तुमच्या आवडत्या ॠतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.