Advertisements
Advertisements
Question
जीवनविम्याचे (आयुर्विमा) प्रकार स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
- संपूर्ण जीवन विमा (Whole life policy): या विम्या अंतर्गत विमाधारकाचे संपूर्ण जीवनाचा विमा घेतला जातो. विमाधारकाला विमाधारक जिवंत असेपर्यंत विमा हमीदाराकडून/संस्थेकडून पैसे/भरपाई मिळत नाही. सदर विम्यामध्ये विमा हप्ता हा सामान्यपणे कमी असतो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर निर्देशित व्यक्तीस अथवा कायदेशीर वारसदारास भरपाई/पैसे देय होतात.
- एन्डोमेन्ट (Endowment policy) विमा: या विम्याअंतर्गत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. विमाधारकाला अथवा वारसदाराला विम्याची रक्कम बक्षीसीसह (bonus) मृत्यूपश्चात वारसदाराला किंवा विशिष्ट कालावधीची मुदत संपल्यानंतर विमाधारकाला दिली जाते.
- मुदत विमा (Term Insurance): मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. सर्व विम्यांमध्ये मुदतीच्या विम्यासाठी सर्वात कमी विमा हप्ता असतो. संपूर्ण विमा कालावधीसाठी विमा निश्चित केला जातो आणि संपूर्ण कालावधीसाठी जो बदलत नाही. अकाली मृत्यू झाल्यास, विम्याच्या लाभार्थ्यांना विमा कराराच्या अटींप्रमाणे नमूद केलेली रक्कम लाभ म्हणून मिळते.
- वार्षिक (Annuity Policy) विमा: सदर विम्यामध्ये विमाधारकास ठरावीक कालावधी दरम्यान एकरकमी अथवा हप्त्यांमध्ये विम्याचा हप्ताभरावा लागतो. विमाधारकास ठरावीक कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षांसाठी रकमेची परतफेड मिळते. हा विमा निवृत्ती योजनेप्रमाणे आहे.
- पैसे परतफेड (Money Back Policy) विमा: सदर विम्यामध्ये विम्याच्या कालावधीच्या एकूण विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी विमाधारकास मिळते. तसेच विमा कालवधी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अवलंबितांना/लाभार्थींना पूर्ण रकमेच्या लाभाची हमीदेखील देते. सामान्यत: सदर विमा चार प्रकारांमध्ये उपलब्ध असतो जसे की, १२-१५-२०-२५ वर्षे इत्यादी.
- बाल विमा (Child Insurance): सदर विमा योजना ही बचत आणि गुंतवणूकीची विमा योजना आहे. ही योजना मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी असते. सदर विम्याद्वारे मुले त्यांची विविध स्वप्ने साकारू शकतात. सदरयोजने अंतर्गत विमाधारक मुलांच्या जन्मापासून गुंतवणूक सुरू करू शकतो आणि मूल सज्ञान झाल्यानंतर बचतीमधून ठराविक रक्कम काढण्यासाठी मुभा असते. काही विशिष्ट बाल विमा योजना विशिष्ट अंतराने मध्यवर्ती (Intermediate) पैसे काढण्याची मुभा देतात.
- सेवानिवृत्ती विमा योजना (Retirement Plan): सदर विमा योजना जी बचतीची आणि गुंतवणूकीची विमाधारकास निवृत्ती नंतर/निवृत्तीवेळी संधी देते म्हणून या योजनेस सेवानिवृत्ती विमा योजना म्हणतात. कालावधी संपण्यादरम्यान तयार झालेल्या रकमेची/ उत्पन्नाची गुंतवणूक, उत्पन्न मिळविण्यासाठी केली जाते त्यास निवृत्ती/वार्षिकी असे संबोधतात.
- ULIP विमा योजना: सदर विमा योजना विम्याबरोबरच गुंतवणूकीची संधी विमाधारकास प्राप्त करून देते. या योजना सामान्यतः लोकप्रिय विमायोजना आहेत.
shaalaa.com
व्यवसाय सेवा (Business services) - विमा (Insurance)
Is there an error in this question or solution?