Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे. त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा.
नाकतोडा - साप- भातशेती - गरुड - बेडूक
Short Note
Solution
- योग्य अन्नसाखळी:
भातशेती → नाकतोडा→ बेडूक → साप → गरुड. - वरील अन्नसाखळी भू-परिसंस्थेतील आहे.
- भू-परिसंस्थेत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात. जसे कीटक, पक्षी, सस्तन प्राणी इत्यादी.
- उदाहरणात भातशेती म्हटले आहे याचा अर्थ ही परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी. भाताच्या शेतात पाणी साठलेले राहते. त्यामुळे तेथे बेडूक वास्तव्य करतात.
- वरील अन्नसाखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत. प्राथमिक भक्षक नाकतोडा हा कीटक आहे. द्वितीय भक्षक बेडूक, तृतीयक भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे. या प्रत्येक पोषणपातळीवरच्या जैविक घटकांवर जीवाणू, कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात. या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपांतून ते थेट गरुडापर्यंतच्या पोषणपातळीत हस्तांतरित होते.
shaalaa.com
पर्यावरण व परिसंस्था संबंध
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा.
पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे.
पर्यावरणावर परिणाम करणारे दोन मानवनिर्मित घटक लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.
शास्त्रीय कारणे लिहा.
निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.