Advertisements
Advertisements
Question
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
Solution 1
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात 'मार्क्सवादी इतिहासलेखन' हा एक प्रमुख प्रवाह आहे.
- मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला 'मार्क्सवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
- मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
- प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो. याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे.
- मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहासलेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो.
Solution 2
प्रस्तावना: स्वातंत्र्योत्तरकाळातील इतिहासलेखनातील नवीन वैचारिक प्रवाहापैकी मार्क्सवादी इतिहासलेखन हा एक वैचारिक प्रवाह आहे.
१. मार्क्सवादी इतिहासलेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मार्क्सवादी इतिहासलेखनामध्ये केंद्रस्थानी असतो.
२. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्त्वाचे सूत्र आहे.
३. मार्क्सवादी इतिहासकारांनी समाजातील जातिव्यवस्था, होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला असून यामध्ये दामोदर कोसंबी, कॉमे्रड डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
४. कॉम्रेड डांगे यांचे 'प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी' हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.
निष्कर्ष: अशाप्रकारे, मार्क्सवादी इतिहासलेखनाद्वारे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करण्यात आले.
RELATED QUESTIONS
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँड डफ | ______ |
______ |
द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे | ______ |
______ | हू वेअर द शूद्राज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया |
जेम्स ग्ँट डफ | ______ |
______ | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री. अ. डांगे | ______ |
______ | हू वेअर द शुद्राज |
पुढील तक्ता पूर्ण करा.
स्त्रीवादी लेखिका | स्त्रीवादी लेखन |
ताराबाई शिंदे | ______ |
______ | द हाय कास्ट हिंदू वुमन |
मीरा कोसंबी | ______ |
______ | रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज |
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.