Advertisements
Advertisements
Question
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
Solution 1
भाषाशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र आणि इतिहासलेखन यांत मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे-
- राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले.
- इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार मांडला.
- केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हे, असे त्यांचे मत होते.
- आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.
- अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.
- स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहासलेखनाला दिलेले मोठे योगदान आहे.
Solution 2
प्रस्तावना: वि. का. राजवाडे यांनी इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी विषयांवर मूलभूत संशोधन करून, मराठी भाषेतून इतिहासलेखन केले.
१. राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. तसेच, आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे या विचाराचा पुरस्कार केला.
२. राजवाडे यांनी मांडलेले महत्त्वपूर्ण विचार:
अ. ’इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती नव्हेत“.
ब. ’मानवी इतिहास हा काल व स्थल यांनी बद्ध झालेला असून काल, स्थल आणि व्यक्ती यांची सांगड म्हणजे ऐतिहासिक प्रसंग होय.“
३. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा राजवाडे यांचा आग्रह होता. इतिहाससंशोधनाच्या कार्याकरता त्यांनी ७ जुलै १९१० रोजी पुणे येथे 'भारत इतिहास संशोधक मंडळ' स्थापन केले.
निष्कर्ष: अशारीतीने, राष्ट्रवादी इतिहासलेखनाद्वारे वि. का. राजवाडे यांनी इतिहासाच्या अभ्यासाला तात्त्विक बैठक मिळवून दिली.
RELATED QUESTIONS
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
वंचितांचा इतिहास
रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
टिपा लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
वंचितांचा इतिहास
स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.
बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.