Advertisements
Advertisements
Question
'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.
Solution
लेखकांच्या एका ग्रंथप्रेमी मित्रांनी लेखकांना पुस्तक वाचायला देताना खूप अटी घातल्या. त्यांचे सांगणे अपमानास्पद वाटेल असेच होते. पण लेखकांना ते अपमानास्पद वाटले नाही. याचे कारण लेखक स्वतः ग्रंथप्रेमी होते. म्हणूनच त्यांना ग्रंथप्रेमी माणसाच्या शब्दांमागील भावना समजून घेता आली. त्यांनी लेखकांना स्वतःची भूमिका समजावून सांगितली. एका कविमित्राने त्यांच्याकडून घेतलेली दोन पुस्तके परत केलीच नाहीत. हे त्या ग्रंथप्रेमी मित्रांना जिव्हारी लागले. त्यांनी निर्णय घेऊन टाकला की आता यापुढे कोणालाही पुस्तक दयायचे नाही. याचे कारण त्यांची पुस्तके त्यांना स्वतःच्या अपत्यासारखी वाटत होती. म्हणून पुस्तके नसली तर राजवाडाही स्मशानासारखा वाटेल आणि सोबत पुस्तके असतील तर काळ्यापाण्याची शिक्षाही आनंदाने स्वीकारीन असे ते ग्रंथप्रेमी लेखकांना सांगतात. यावरून त्यांची ग्रंथांवरची निता लक्षात येते. असे निष्ठावंत वाचक लेखकाना हल्ली आढळतच नाही.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तुलना करा.
'पुस्तकरूपी' मित्र |
'मानवी' मित्र |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
कारणे लिहा.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण .............
कारणे लिहा.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण .............
कृती करा:
हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ
कृती करा:
उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये
अर्थ स्पष्ट करा.
दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे.
अर्थ स्पष्ट करा.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.
वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात', हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.