Advertisements
Advertisements
Question
पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
लेखकांच्या मते, मानवी जीवनामध्ये पुस्तकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वाचकाला पुस्तकातून चांगले काय, वाईट काय याचे दर्शन घडते. तो चांगले-वाईट ओळखायला शिकतो. वाईटाचा त्याग केला पाहिजे आणि चांगले आत्मसात केले पाहिजे ही दृष्टी त्याला मिळते. त्यानुसार जीवन जगायला तो सुरुवात करतो. यावरून माणसाच्या आयुष्यातील पुस्तकाचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल. उदाहरणार्थ, महात्मा फुले यांचे साहित्य आपण वाचले की शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती, होणारा अन्याय आपल्या लक्षात येऊ लागतो. त्यामुळे आपल्या अंत:करणात भावनांची मोठी खळबळ उडते. आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीचे आपण निरीक्षण करतो. त्यात चांगले काय आहे, वाईट काय आहे, हे आपल्याला कळू लागते. म्हणून असे पुस्तक आपण कधी विसरू शकत नाही. उलट, असे पुस्तक आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो.
प्रत्येक वाचनाच्या वेळी आपल्याला नवीन दृष्टी मिळते. परिस्थितीचे अधिकाधिक चांगले ज्ञान मिळते. अशा परिस्थितीत काय केले पाहिजे आणि काय करता कामा नये यांचीही दृष्टी मिळते. मग आपण त्यानुसार जीवन जगायचा प्रयत्न करतो. म्हणजेच, पुस्तक आपल्याला चांगले जीवन जगायला शिकवतात. हे पुस्तकाचे फार मोठे महत्त्व आहे. पुस्तकाचे हे महत्त्व लेखक समजावून सांगत आहेत.
कंपन्यांमध्ये भागीदारी मिळाली. हे सगळे वाचल्यानंतर माझी दृष्टी बदलली. आपणही प्रयत्न करून असे भव्यदिव्य यश मिळवू शकतो, असे मला वाटू लागले. माझी निराशा झटकली गेली. आता जेव्हा जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा तेव्हा ते पुस्तक मी घेतो. कुठूनही वाचायला सुरुवात करतो. माझा कंटाळा निघून जातो आणि मन चैतन्याने भरून जाते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तुलना करा.
'पुस्तकरूपी' मित्र |
'मानवी' मित्र |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
कारणे लिहा.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण .............
कारणे लिहा.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण .............
कृती करा:
हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ
कृती करा:
उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये
अर्थ स्पष्ट करा.
दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे.
अर्थ स्पष्ट करा.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.
वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात', हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.