Advertisements
Advertisements
Question
'उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात', हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
Solution
उत्तम साहित्यकृती आपल्याला सदोदित भावनिक सोबत करतात, हे खरेच आहे. अशी पुस्तके आपल्याला उभारी देतात. मी दहावीची परीक्षा दिली. सर्व पेपर काही चांगले गेले नव्हते. कमी गुण मिळणार याची मला मनोमन खात्री होती. निराश झालो होतो. काय करावे ते सुचत नव्हते.तेवढ्यात एक पुस्तक माझ्या हाती लागले - अच्युत गोडबोले या लेखकांचे 'मुसाफिर'. वाचायला सुरुवात केली. मग पुढे वाचत गेलो, वाचत गेलो आणि वाचतच गेलो. लेखकांनी स्वतःचे आत्मकथन त्यात मांडले आहे. लेखक स्वतः प्रचंड बुद्धिमान. आयआयटीसारख्या मातब्बर खूप प्रतिष्ठित अशा शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला होता. कोणत्या तरी कारणाने सामाजिक चळवळीकडे लक्ष गेले. देशातील 'अन्याय, अत्याचार यांचे दर्शन घडले. जीवनाचा मार्ग ढळला. मग कसेबसे स्वतःला सावरले. झोकून देऊन अभ्यास सुरू केला. प्रचंड यश मिळत गेले. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर गाजली. जगभर मोठमोठ्या कंपन्यांना मार्गदर्शन केले. कित्येक कंपन्या स्वतः स्थापन केल्या. अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी मिळाली. हे सगळे वाचल्यानंतर माझी दृष्टी बदलली. आपणही प्रयत्न करून असे भव्यदिव्य यश मिळवू शकतो, असे मला वाटू लागले. माझी निराशा झटकली गेली.. आता जेव्हा जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा तेव्हा ते पुस्तक मी घेतो. कुठूनही वाचायला सुरुवात करतो. माझा कंटाळा निघून जातो आणि मन चैतन्याने भरून जाते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तुलना करा.
'पुस्तकरूपी' मित्र |
'मानवी' मित्र |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
कारणे लिहा.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण .............
कारणे लिहा.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण .............
कृती करा:
हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ
कृती करा:
उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये
अर्थ स्पष्ट करा.
दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे.
अर्थ स्पष्ट करा.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.
वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.