Advertisements
Advertisements
Question
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Solution
'पक्षी जाय दिगंतरा' ही संत जनाबाईंच्या अभंगातील ओळ आहे. पक्षी दूरवर उडून आपल्या पिलांच्या चाऱ्याची, अन्नपाण्याची सोय करतो. त्यासाठी तो कितीही दूर उडू द्या, त्याचे लक्ष सदैव आपल्या बाळापाशी, घरट्याशी असते. या पाठात वर्णन केलेले पक्षीही आपल्या उपजीविकेसाठी हजारो मैलांचे अंतर पार करत असतात. पक्ष्यांनाही आपल्या इतकीच आपल्या पिलांची, कुटुंबांची काळजी असते. हिवाळ्यात अति बर्फवृष्टी झाल्यास अन्नाचे दुर्भिक्ष निर्माण होते. परिणामी, पक्ष्यांवर व त्यांच्या पिलांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. असे होऊ नये, म्हणून पक्षी एकत्रितरीत्या अशा जागी स्थलांतर करतात, जिथे त्यांना अन्नाचा तुटवडा निर्माण होत नाही. पाठात वर्णन केलेले उत्तरेकडील पक्षी हिवाळ्याच्या आगमनापूर्वीच दक्षिणेकडे प्रयाण करतात व अन्नाच्या तुटवड्यापासून स्वत:चे व पिलांचे संरक्षण करत असतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
दुर्घट-
बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत वर्णन करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.