English

प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या. १. मौखिक परंपरा २. कोरीव लेख ३. लिखित साहित्य - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या.

१. मौखिक परंपरा

२. कोरीव लेख

३. लिखित साहित्य

Answer in Brief

Solution

१. मौखिक परंपरा: 

अ. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवतपरंपरा मौखिक परंपरेने जपल्या जात असत.

ब. तसेच सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृतीदेखील केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात असत.

२. कोरीव लेख:

अ. भारतामधील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वांत प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे.

ब. मौर्य घराण्यातील सम्रट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी तिसर्या शतकापासून या कोरीव लेखांची सुरुवात होत असून सम्रट अशोकाने हे लेख प्रस्तर आणि दगडी स्तंभांवर कोरले आहेत.

क. त्यानंतरच्या इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनची धातूंची नाणी, ताम्रपट, मूर्ती व शिल्पे इत्यादींवरही कोरीव लेख उपलब्ध आहेत.

ड. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांद्वारे संबंधित राजांचा काळ, त्यांची वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था, समाजरचना, महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी, हवामान व दुष्काळ यांबाबत महत्त्वाची माहिती मिळते. 

३. लिखित साहित्य: 

अ. प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यासाठी रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथ, भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसेच परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने ही इतिहासाची महत्त्वपूर्ण लिखित साधने आहेत.

ब. या काळातील राजांची चरित्रे आणि राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखनही महत्त्वाचे साधन आहे.

क. याचे उदाहरण म्हणजे इसवी सनाच्या ७ व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले 'हर्षचरित' हे ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपातील संस्कृत काव्य होय. यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचे चित्रण केले आहे.

अशा रीतीने, प्राचीन भारतीय इतिहासाचे सर्वतोपरीने ज्ञान होण्यास तत्कालीन साहित्य उपयुक्त ठरते.

shaalaa.com
भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - लांब उत्तरे २

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
लांब उत्तरे २ | Q ५. ५.

RELATED QUESTIONS

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ______ हे होते.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

राजतरंगिणी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगतो.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते. 


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

सोहगौडा ताम्रपट

      हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा, असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्रह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीला जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.

१. सोहगौडा ताम्रपट कोणत्या राज्यात सापडला?

२. सोहगौडा ताम्रपटावर आढळणारी चिन्हे आणखी कोठे आढळतात?

३. सोहगौडा ताम्रपटाद्वारे कोणता इतिहास समजतो?


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

सोहगौडा ताम्रपट: हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.
  1. सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला?
  2. सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे?
  3. सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा.

बखर म्हणजे काय?


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×