Advertisements
Advertisements
Question
प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत?
Answer in Brief
Solution
- प्रोबायोटिक्स क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत. त्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
- उदा., प्रोबायोटिक्समुळे आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती होतात.
- क्लॉस्ट्रिडीअमसारख्या इतर घातक सूक्ष्मजीवांवर हे चांगले जीवाणू नियंत्रण ठेवतात. तसेच अशा जीवाणूंची चयापचय क्रियांवर देखील नियंत्रण ठेवतात.
- प्रोबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते.
- चयापचयक्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात.
- एखाद्याने जर प्रतिजैविकांचे उपचार घेतले असतील तर त्यामुळे अन्न मार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीव हे अकार्यक्षम होतात, अशा उपयुक्त जीवाणूंना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटिक्स करतात.
- अतिसाराच्या उपचारासाठी प्रोबायोटिक्स वापरतात.
- तसेच इतर पाळीव प्राण्यांच्या जसे कोंबड्यांवरील उपचारांसाठी हल्ली प्रोबायोटिक्स वापरतात.
- या यांच्या फायद्यामुळे अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय झाली आहेत.
shaalaa.com
प्रोबायोटिक्स (Probiotics)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील _______ सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो.
अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारासाठी हल्ली ___________ चा वापर होतो.
वेगळा घटक ओळखा.
जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
1) बेकर्स यीस्ट | अ) प्रोबायोटिक्स |
2) सोअर क्रुट | ब) पाव |
3) लाएजेस | क) प्रतिजैविक |
4) पेनिसिलिन | ड) सूक्ष्मजैविक विकर |
शास्त्रीय कारणे लिहा.
सध्याच्या काळात प्रोबायोटिक्सना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.