Advertisements
Advertisements
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृति करा:
(१) कामक्रोधरूपी विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय: (२)
(य) ______
(र) ______
(२) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा - (२)
(य) सत्त्व उतारा देऊन, म्हणजे ______.
(अ) जीवनसत्त्व देऊन
(आ) सत्त्वगुणांना आश्रय घेऊन
(इ) सात्त्विक आहार देऊन
(ई) सत्त्वाचे महत्त्व सांगून
(र) ‘विंचू चावला वृश्चिक चावला’, या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे - ______
(अ) भारूड उत्तम गाता येते.
(आ) वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो.
(इ) भारुडाला अर्थ प्राप्त होतो.
(ई) भारुड अधिक रंजक बनते.
विंचू चावला वृश्चिक चावला। पंचप्राण व्याकुळ झाला। मनुष्य इंगळी अति दारुण। ह्या विंचवाला उतारा। सत्त्व उतारा देऊन। |
(३) अभिव्यक्ति: (४)
सद्गुण अंगी बाणविण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
Concept: विंचू चावला... (भारूड)
खालील ओळींचा अर्थ लिहा.
ह्या विंचवाला उतारा। सत्त्व उतारा देऊन। |
Concept: विंचू चावला... (भारूड)
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे (२)
(य) ______
(र) ______
(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव (२)
(य) ______
(र) ______
सर्वांत आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत ‘काय लिहावं?’ याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो, त्या वेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. ‘पहाट झालीय काय?’ असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’ पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचंदेखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेलादेखील राहावत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार, की तुम्हांला त्याची गंधवार्तादेखील लागू नये! पहाट कशी होते, हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल. त्यातली नजाकत जाणवेल. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅक्रांडावरची नि गुलमोहोरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो; पण जसजशी पहाट उजाडते, तसतसा तो वाढत जातो. |
(३) स्वमत अभिव्यक्ति: (४)
पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
‘तुम्ही अनुभवलेली पहाट’ तुमच्या शब्दांत वर्णन करा.
Concept: रेशीमबंध
समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत. |
वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
Concept: समुद्र कोंडून पडलाय
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिंज्या. हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरूंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोके. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं, आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरांतील. |
(१) कारणे लिहा.
(य) समुद्र अस्वस्थ होतो, कारण ______
(र) समुद्र शिणून जातो, कारण ______
(२) चौकटी पूर्ण करा.
(३) अभिव्यक्ती:
शहरांतील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात ते स्पष्ट करा.
Concept: समुद्र कोंडून पडलाय
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) लेखकाने शक्तिप्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या - (२)
(य) ______
(र) ______
(२) दंतवैद्याने केलेल्या दोन क्रिया - (२)
(य) ______
(र) ______
दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’ |
(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)
‘यापुढे दंतसप्ताह नाही,’ लेखकाच्या या विधानाची कारणमीमांसा तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
दातदुखीच्या कथा-व्यथा सोदाहरण लिहा.
Concept: दंतकथा
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
दात दुखायला लागला, की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली, की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यांत फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला, तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही ! बरे, हे दुखणे तरी साधे, सरळ असावे? तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एकघाव घालीत असतो. असे म्हणतात, की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसांसारखा असावा. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ का होतो? दातांत आणि चोरांत साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रात्री गडबड करतात. |
(१) जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार - (२)
(य) ______
(र) ______
(२) दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते: (२)
(य) ______
(र) ______
(३) स्वमत अभिव्यक्ती: (४)
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
किंवा
दातदुखीच्या कथा-व्यथा तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: दंतकथा
काव्यसौंदर्य.
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
Concept: आरशातली स्त्री
खालील ओळींचा अर्थ लिहा:
आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस
ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन
देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे
वरदान समजून
Concept: आरशातली स्त्री
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा: (२)
(य) कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य लिहा. (१)
(र) कथानकाचे प्रयोजन लिहा. (१)
कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे साहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटनामालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर होते; म्हणून कथेत ‘घटना’ हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच ‘कथाबीज’ असे म्हणतात. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाववैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला ‘पात्र’ असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची ‘स्व’ निर्मिती असते. |
(२) कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा. (२)
Concept: कथा- साहित्यप्रकार-परिचय
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा. (२)
(य) कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचण्यामागील कारण लिहा. (१)
(र) कथेतील भाषायोजनेचे घटक लिहा. (१)
कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितिजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यांनुसार कथेचे भाषारूप आणि शैलीविशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणत: प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. |
(२) कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहा. (२)
Concept: कथा- साहित्यप्रकार-परिचय
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर-नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्षबिंदूही (क्लायमॅक्स) असतो कथेत! अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षक ही असते. 'एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखादया विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा.' अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखादया कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरणनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची ही असू शकते. |
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा: (२)
(य) प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा.
(र) कथेची व्याख्या लिहा.
(२) कथा लेखनासाठीचे आवश्यक असणारे चार मुद्दे लिहा. (२)
Concept: कथा- साहित्यप्रकार-परिचय
घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Concept: शोध
अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
Concept: शोध
‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
Concept: शोध
अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.
Concept: शोध
'शोध' कथेतील 'टॅक्सी ड्रायव्हर' या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.
Concept: शोध
गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा.
Concept: गढी
बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: गढी