Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृती मध्ये ΔABC च्या BC बाजू वर D आणि E बिंदू असे आहेत की BD = CE तसेच AD = AE तर दाखवा की, ΔABD ≅ ΔACE.
उत्तर
∆ADE मध्ये,
रेख AD = रेख AE ...(पक्ष)
∴ ∠ADE = ∠AED ...(1) (समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय)
आता,
∠ADE + ∠ADB = 180° ...(2) (रेषीय जोडीतील कोन)
∠AED + ∠AEC = 180° ...(3) (रेषीय जोडीतील कोन)
∴ ∠ADE + ∠ADB = ∠AED + ∠AEC ...[2) व (3) वरून]
∴ ∠ADE + ∠ADB = ∠ADE + ∠AEC ...[(1) वरून]
⇒ ∠ADB = ∠AEC ...(4)
∆ABD व ∆ACE मध्ये,
∠ADE = ∠AEC ...[(4) वरून]
रेख BD ≅ रेख CE ...(पक्ष)
रेख AD ≅ रेख AE ...(पक्ष)
∴ ∆ABD ≅ ∆ACE ...(बाकोबा कसोटी)
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती मध्ये, बिंदू A हा ∠XYZ च्या दुभाजकावर आहे. जर AX = 2 सेमी तर AZ काढा.
खालील आकृती मध्ये ∠RST = 56°, रेख PT ⊥ किरण ST, रेख PR ⊥ किरण SR आणि रेख PR ≅ रेख PT असेल तर ∠RSP काढा. कारण लिहा.
ΔPQR मध्ये जर PQ > PR आणि ∠Q व ∠R चे दुभाजक S मध्ये छेदतात तर दाखवा की, SQ > SR.
खालील आकृती मध्ये ΔABC च्या ∠BAC चा दुभाजक BC ला D बिंदूत छेदतो, तर सिद्ध करा की AB > BD.
खालील आकृती मध्ये रेख PT हा ∠QPR चा दुभाजक आहे. बिंदू R मधून काढलेली रेख PT ला समांतर असणारी रेषा, किरण QP ला S बिंदूत छेदते, तर सिद्ध करा, PS = PR.
खालील आकृती मध्ये रेख AD ⊥ रेख BC. रेख AE हा ∠CAB चा दुभाजक असून E-D-C. तर दाखवा, की m∠DAE = `1/2` (m∠C - m∠B)