Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.
उत्तर
मला पक्षिमित्र बनायला नक्कीच आवडेल. जर मी पक्षिमित्र झाले, तर मला अडचणीत सापडलेल्या, आपल्या वेदना शब्दांत व्यक्त न करू शकणाऱ्या मुक्या जीवांची मदत करता येईल. पक्ष्यांचे प्राण वाचवता येतील कारण पक्षी हे निसर्गातील महत्त्वाचा घटक आहेत. जेव्हा पक्ष्यांची एखादी प्रजाती दुर्मीळ किंवा नष्ट होते, तेव्हा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कित्येक इतर प्रजातींवरही त्याचा वाईट परिणाम होतो. आजकाल वाढती वृक्षतोड, वाढते प्रदूषण, मोबाइल टॉवर्समुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे, म्हणूनच त्यांचे रक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
(१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
(२) | अक्षरशत्रू कुलूप | |
(३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
(४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.
फरक स्पष्ट करा.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.
२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.