Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.
(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
(१) | |||
(२) | × | ||
(३) | |||
(४) | × | ||
(५) |
उत्तर
(१) | फु | क | ट |
(२) | × | मा | ठ |
(३) | रे | ता | ड |
(४) | × | गू | ढ |
(५) | पु | र | ण |
शेवटच्या रकान्यातील वर्ण मूर्धन्य आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
हरसाल -
खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा.
विशेषण | विशेष्य |
विहंगम | वारा |
गरमागरम | पाषाण |
घोंघावणारा | पायवाट |
काळाशार | दृश्य |
अरुंद | कांदाभजी |
खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
गिर्यारोहण
‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.
रोजगार-
खालील शब्द आपण कधी वापरतो?
कृपया, माफ करा, आभारी आहे. |
खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.
घरातील सगळे म्हणाले, ‘______ सिनेमाला जाऊ.’
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा.
(अ) दरी -
(आ) पान -
(इ) माठ -
(ई) लाडू -
(उ) पुस्तक -
(ऊ) वही -
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
पेशंट -
विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.
मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे |
हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
समता (माया) -
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
थांबणे ×
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मी चेंडू ______
खालील शब्दाचा लिंग ओळखा.
पहाट - ______
अनुस्वार वापरून लिहा.
गोन्धळ - ______
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी’’
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’
पुढील शब्दांतील अक्षरांवरून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा:
मिरवणूक