Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔLMN असा काढा, की ∠M = 60°, ∠N = 80° आणि LM + MN + NL = 11 सेमी.
उत्तर
कच्ची आकृती:
स्पष्टीकरण:
(i) आकृतीत दाखवल्याप्रमाणे, MN वर बिंदू S आणि T घ्या, जसे की
MS = LM आणि NT = LN ...(i)
MS + MN + NT = ST ...[S-M-N, M-N-T]
∴ LM + MN + LN = ST ...(ii)
तसेच,
LM + MN + LN = 11 cm ...(iii)
∴ ST = 11 सेमी ...[(ii) आणि (iii) पासून]
(ii) ∆LSM मध्ये
LM = MS
∴ ∠MLS = ∠MSL = x° ...(iv) [समद्विभुज त्रिकोण प्रमेय]
∆LMS मध्ये, ∠LMN हा बाह्य कोन आहे.
∴ ∠MLS + ∠MSL = ∠LMN ...[दूरस्थ आतील कोन प्रमेय]
∴ x + x = 60° ...[(iv) पासून]
∴ 2x = 60°
∴ x = 30°
∴ ∠LSM = 30°
∴ ∠S = 30°
त्याचप्रमाणे, ∠T = 40°
(iii) आता, ∆LST मध्ये
∠S = 30°, ∠T = 40° आणि ST = 11 सेमी
म्हणून, ALST काढता येतो.
(iv) LM = MS
∴ ∴ बिंदू M रेख LS च्या लंबदुभाजकावर आहे.
तसेच LN = NT
∴ बिंदू N हा रेख LT च्या लंबदुभाजकावर आहे.
∴ बिंदू M आणि N अनुक्रमे LS आणि LT चे लंबदुभाजक रेखाटून शोधता येतात.
∴ ∆LMN काढता येतो.
रचनेच्या पायऱ्या:
- रेख ST हा 11 सेमी लांबीचा रेषाखंड काढा.
- बिंदू S पाशी 30° मापाचा कोन करणारा किरण काढा.
- बिंदू T पाशी 40° मापाचा कोन करणारा किरण काढा.
- दोन्ही किरणांच्या छेदनबिंदूला L हे नाव द्या.
- रेख LS व रेख LT चे लंबदुभाजक काढा. ते रेषा ST ला ज्या बिंदूंत छेदतील त्यांना अनुक्रमे M आणि N ही नावे द्या.
- रेख LM आणि रेख LN काढा.
ΔLMN हा अपेक्षित त्रिकोण आहे.