Advertisements
Advertisements
प्रश्न
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’
काय उपयोग तुमच्या पैश्याचा?
काय उपयोग तुमच्या धनाचा?
जर नसेल थेंबही पाण्याचा,
म्हणून जपा थेंब-थेंब पाण्याचा.
पाणी म्हणजे जल, नीर, तोय, उदक, अंबू, सलिल, जीवन. कितीतरी शब्द! पण पाण्याला जीवन असे हे जे म्हटले आहे ते अगदी बरोबर वाटते. खरेच पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच शक्य नाही.
जगातील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज लागते. छोट्या-छोट्या जीव, जंतू पासून ते विशालकाय प्राण्यांना सुद्धा पाण्याची गरज असतेच. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे अस्तित्व पाण्यामुळेच आहे.
पिण्याच्या आणि घरगुती वापराशिवाय पाणी जगाच्या अस्तित्वासाठी सुद्धा आवश्यक आहे. पाण्याशिवाय आपली पृथ्वी टिकणार नाही. दैनंदिन जीवनात पाणी पिण्या व्यतिरिक्त इतर अनेक कामासाठी वापरले जाते. स्वच्छतेच्या कामासाठी ही पाण्याचा खूप वापर केला जातो.
शेती संपूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. जर पाणी नसेल तर आपल्याला शेतीही करता येणार नाही. शेती नाही तर अन्नधान्य नाही. अन्नधान्य नाही तर माणसाचे जगणे अशक्यच. पाणीचे नसेल तर हा सुंदर हिरवागार निसर्ग कोमेजून जाईल. कुठेही चैतन्य दिसणार नाही म्हणून पाणी हे मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे.
पाणी हे अनमोल आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. आपण पाहतो हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते तसेच खूप पाऊस पडतो पण पाणी जिरवले न गेल्यामळे पाणी समुद्राला जाऊन मिळते त्याचा शेतीसाठी वापर होत नाही. त्यावरही उपाययोजना होणे गरजेचे आहे.
पाण्याच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत शुद्ध ठेवणे ही काळाची गरज आहे. तरच मानवी जीवन सुखी समृद्ध होईल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
नमुना कृती:
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.
खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.