Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
उत्तर
पहाटेचे सौंदर्य
पहाट आपल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर एक नवीन दिवसाची नवीन स्वप्नांची नवीन ध्येयाची नवीन योजनांची आणि नवीन आयुष्याची नवीन आनंदाची नवीन पर्वाची सौंदर्य घेऊन आलेली असते. अश्याच एका सुंदर पहाटेच्या सौंदर्याचा अनुभव मी घेतला.
वातावरण खूप छान होते. आजुबाजुला अनेकजण उत्साहात व्यायाम करत होते. आरोग्याबाबत जागरूक लोक, जवळपास सर्व वयोगटातील लोक मॉर्निंग वॉक करताना मला पहायला मिळाले. वाटेत लागलेल्या मैदानावर मुले पळण्याचा व्यायाम करीत होती. त्यांच्याकडे पाहून आपणही रोज रोज असे व्यायामाला यायचे हे मनातल्या मनात ठरवले. पहाटेचा तो गार मंद वारा मला अनुभवता आला. मी अनेक कवितांमध्ये पहाटेच केलेलं सुंदर वर्णन वाचले होते परंतु आज ते स्वतः समोर पहायला मिळत होते. निसर्गाची नवनवीन रूपे मी पाहिली. इथून पुढे पहाटे लवकर उठून पहाटेचे सौंदर्य अनुभवायचे मी ठरवले. मनाला वेगळीच प्रसन्नता येत होती. हा अनुभव माझ्यासाठी नवा होता. अंधाराचे जाळे फिटू लागले होते. हळूहळू सूर्य नारायण वर येऊ लागला. आता रस्ते नीट दिसू लागले होते.
सकाळी झाडांवर पक्षी किलबिलाट करताना पाहून मन आतून प्रसन्न होते. बहरलेली शेतं बघून जणू स्वर्गच अनुभवल्यासारखं वाटले. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि हळू हळू वर येणारा सूर्य हे दृश्य खूपच छान वाटत होते. हे रम्य दृश्य मला अनोखं होतं. निसर्गात केवढे सौंदर्य दडले आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. रस्त्यावर जास्त रहदारी पहायला मिळत न्हवती. काही लोक आळस झटकत व्यायाम करत होती. वातावरण शांत आणि प्रसन्न वाटत होते. ताजी हवा माझ्या शरीरातील सर्व आळस काढून टाकत होती. शेजारच्या देवळामधे काकड आरती चालू होती. काही चहाची दुकाने उघडली होती. वातावरण थोडे थंड असल्यामुळे लोकांनी कानटोपी, स्वेटर घातले होते. गरम गरम चहा घेत माणसं ताजीतवानी होत होती. तिथेच छान छान भक्तिगीते ऐकू येत होती. त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होते.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.
खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.