Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
उत्तर
चला खेड्याकडे
'माझं कोकणातील गाव, मनामध्ये त्याचा ठाव,
जन येथले प्रेमळ, आनंद असे येथे अंमळ'
कवितेच्या या ओळी खेड्यांचे खरे रूप दर्शवणाऱ्या आहेत. खेड्यातले जीवन म्हणजे शांत व निरामय जीवन. शहरातील धावपळ नाही, गर्दी किंवा गोंधळ नाही, अथवा घड्याळाच्या काट्याचे गणित नाही. खेड्यातील हवेतच जणू निवांतपणा गवसतो. वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने होणारा त्रास नाही. पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग यावी. नदीचे खळखळणारे पाणी, गाई-म्हशींचे हंबरणे अशी निसर्गाच्या कुशीत नेणारी खेड्यातील दुनिया. खेड्यातले वातावरण शुद्ध. रासायनिक कारखाने किंवा भरमसाठ वाहने नसल्यामुळे आजही खेडोपाडी शुद्ध हवा अनुभवता येते. माणसाला श्वास घेण्यास, खरंतर 'मोकळा श्वास' घेण्यास खेड्यासारखे ठिकाण नाही. येथील हे प्रसन्न वातावरण मानवी आरोग्यासही पोषक ठरते.
शहरीकरणाच्या झपाट्यात विविध जाती धर्मांचे, विविध संस्कृती असलेले लोक एकमेकांच्या सान्निध्यात आले. तरीही कामात व्यस्त असलेल्या, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या लोकांना इतरांकडे लक्ष देण्यास किंबहुना स्वत:च्या घरात लक्ष देण्यास वेळ नाही. केवळ पैसा आणि काम यांमध्ये गुंतलेले लोक प्रेमळ, आनंदी जीवन विसरून गेल्यासारखे वाटतात. खेड्यात मात्र लोक कमी असल्यामुळे, एकमेकांना प्रत्यक्ष ओळखत असल्यामुळे प्रत्येकजण सुखदु:खाच्या प्रसंगी एकमेकांच्या घरी जात असतात. संपूर्ण खेडे हे एखादे कुटुंब असल्याप्रमाणे आपुलकी राखून असते.
अशा सुंदर खेड्यांतून रोजगाराकरता शहराकडे वळलेल्या तरुणांना परत खेड्यात आणायचे असेल, तर त्यांच्यासाठी खेड्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. बंद पडलेले लघुद्योग, कुटीरोद्योग सुरू झाले अथवा नव्याने उद्योग निर्माण केले गेले, खेड्यातील नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगांना पाठबळ दिले गेले, तर खेड्यातील तरुण त्याच्या हक्काच्या घरी आनंदाने राहतील. शहरावर येणारा लोकसंख्येचा ताण त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ डॉक्टर किंवा इंजिनिअर बनायचे आहे या भावनेतून शिक्षण दिले जाते. ही पद्धती बदलून शेतकरी हा समाजाचा अत्यावश्यक घटक आहे ही भावना नव्या पिढीच्या मनात रूजवून शेतीचे आधुनिक शिक्षण दिले गेले, तर खेड्यापाड्यांतून शेती पुन्हा बहरेल. शेती शाश्वत आहे आणि ती ओसाड पडून चालणार नाही. ती फुलवण्यासाठी नव्या दमाच्या तरुणांनी खेड्याकडे वळायलाच पाहिजे.
शहरात आलेल्या, शहरातील धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेल्या प्रत्येकाचे स्वप्न असते मी माझ्या आयुष्यातील शेवटचा काळ निवांतपणे माझ्या गावात घालवेन. नोकरी, व्यवसायाच्या संधी, मूलभूत सुविधा निर्माण झाल्या, तर स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वयंपूर्ण खेडी परत एकदा माणसांनी बहरलेली दिसतील आणि जीवनाचा आनंद लुटतील, निवांतपणा अनुभवतील. खेडोपाडी मुक्तपणे जगताना दिसतील. यासाठी आपल्याला गांधीजींच्या 'खेड्यांकडे चला' हा संदेश प्रत्यक्षात उतरवावा लागेल.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
नमुना कृती:
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.
वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुदूदांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
साधना विद्यालय, धुळे इयत्ता दहावी- शुभेच्छा समारंभ दि. ४ फेब्रुवारी स. १० वाजता अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.