Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
उत्तर
मी त्यावेळी अमरावती येथील ज्ञानसंवर्धन विद्यालयात शिकत होतो. 5वी पासूनच या विद्यालयात असल्याने या शाळेतील सर्व शिक्षक इतर विद्यार्थी कर्मचारीबद्दल खूप आपुलकी वाटत होती. दरवर्षी जून महिन्यात नवे ड्रेस, नवी पुस्तकें मिळत होती. त्यामुळे उत्साह वाढत होता असे होता होता कधी 10वीचे वर्ष आले हे कळलेच नाही. 10वीत आल्यावर मे महिन्यापासून जादा तास सुरू होऊन अभ्यासास सुरुवात झाली होती. त्यावर्षी फक्त अभ्यास हे एकच काम असे ध्येय होते.
आम्ही सर्व विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यासामध्ये गढून गेलो होतो. कोणते सण आले गेले याकडे लक्षच नव्हते. आता मला आठवत त्यावेळी फेब्रूवारी महिना होता. परीक्षा एक महिन्यावर येऊन पोहचलेली होती आमचा परीक्षा सराव वर्गामध्ये सुरू होता आणि अचानक दारावर टिक टिक ऐकू आली म्हणून पाहिले तर दारात राम दादा नोटीस घेवून उभे होते. शिक्षकांनी ती नोटीस वाचून सांगितली. 20 फेब्रूवारीला दुपारी 4 वाजता निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आम्हाला नवीनच होता.
तेव्हा त्यावेळी त्यावर चर्चा शुरू झाल्या. अनेकांनी आपली अनेक मते मांडत शेवटी 20 फेब्रुवारी हा दिवस आला. त्यादिवशी आम्ही 10वी चे सर्व विद्यार्थी काही वेगळ्याच आणि विचित्र मन:स्थितीत होतो. एकीकडे आनंद होता. एकीकडे नैराश्य होते. नवीन ध्येयनिष्ठ जीवनाची सुरुवात म्हणून आनंद आणि एवढी चांगली शाळा सोडण्याचे दुःख होते.
दुपारचे चार वाजले होते. कार्यक्रमाला सुरुवात होऊन शिक्षकांनी आपली मनोगते सांगण्यास सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला. सुस्वातीला अभ्यासात 'ढ' असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशी प्रगती केली. 5वी पासूनच्या विविध आठवणी आमच्या समोर सांगू आमच्या मनाला हळहळ वाटू लागली त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते सादर केली.
मी ही माझे मनोगत सांगताना माइया 5वी पासूनच्या प्रवासातील आठवणी आणि प्रगती सांगू लागलो. स्टेजवरून खाली आल्यावर बरेच विद्यार्थी रुमालाने डोळे पुसत असलेले दिसले तेव्हा मुख्याध्यापकांनी कणखर आवाजात सांगितले की आता रडत बसू नका आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.