Advertisements
Advertisements
प्रश्न
मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा.
दीर्घउत्तर
उत्तर
- संप्रेरके आणि रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण होते. अंत:स्रावी ग्रंथीतून संप्रेरके तयार होतात, तर चेतांच्या संपर्कस्थानांजवळ रासायनिक पदार्थ निर्माण होतात.
- अंत:स्रावी ग्रंथी वाहिनीविरहित असून, त्यांचे स्राव थेट रक्तात मिसळतात. या ग्रंथी, ज्या शरीराच्या ठराविक ठिकाणांवर असतात, त्यांची संप्रेरके रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात.
- अंतस्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्यया दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात.
- गरज असेल तितक्याच प्रमाणात संप्रेरकांचे स्रवणे हे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. संप्रेरकाचे स्रवण होण्याचे प्रमाण व वेळ याचे नियमन केले जाते.
- पियुषिका, अवटु, परावटु, अधिवृक्क, स्वादुपिंडातील काही पेशी, जनन ग्रंथी - अंडाशय आणि वृषणग्रंथी आणि यौवनलोपी या महत्त्वाच्या अंत:स्रावी ग्रंथी आहेत.
- वृद्धी संप्रेरक, अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक, अवटु ग्रंथी संप्रेरक, प्रोलॅक्टीन, ऑक्सिटोसीन, ल्युटिनायझिंग हार्मोन, प्रतिमूतल संप्रेरक, पुटिका ग्रंथी संप्रेरक ही पीयूषिकेची संप्रेरके आहेत. यांपैकी वृद्धी संप्रेरक शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. प्रोलॅक्टीन, ऑक्सिटोसीन, ल्युटिनायझिंग हार्मोन, पुटिका ग्रंथी संप्रेरक ही संप्रेरके स्त्रियांच्या शरीरातील प्रजननासाठी विशेष महत्त्वाची आहेत.
- इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही स्त्रीच्या शरीरातील संप्रेरके अंडाशयातून निर्माण होतात, तर टेस्टेस्टेरॉन हे पुरुषाचे संप्रेरक वृषणातून निर्माण होते आणि हे लैंगिक विकासासाठी आवश्यक असते.
- ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन ही स्वादुपिंडाच्या पेशींनी निर्माण केलेली संप्रेरके रक्त शर्करेचे प्रमाण नियंत्रणाखाली ठेवतात.
- अवटु ही महत्त्वाची ग्रंथी थायरॉक्झीन आणि कॅल्सिटोनीन निर्माण करते, थायरॉक्झीनमुळे आपल्या शरीराचा चयापचय व्यवस्थितपणे चालू राहतो. कॅल्सिटोनीन जे अवटुने आणि पॅराथॉर्मोन जे परावटुने निर्माण केले जाते, ही दोन संप्रेरके रक्तातील कॅल्शिअमच्या प्रमाणाचे नियंत्रण करतात.
- ॲड्रेनॅलिन, नॉरॲड्रेनॅलिन, आणि कॉर्टिकोस्टेरॉइड ही अधिवृक्क ग्रंथीची संप्रेरके शरीरातील अनेक कार्ये पार पाडतात, जसे की आणीबाणीच्या आणि भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करणे, हृदय आणि त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणे, चयापचय क्रियेला उत्तेजन देणे आणि Na, k चे संतुलन ठेवणे.
- अशा रितीने रासायनिक नियंत्रण ही खूप धीम्या गतीने होणारी परंतु दीर्घकाल टिकणारी प्रक्रिया शरीराची समस्थिती टिकवते व समन्वय राखते.
shaalaa.com
रासायनिक नियंत्रण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
पियुषिका
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अवटु
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अधिवृक्क
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
यौवनलोपी
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
वृषणग्रंथी
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अंडाशय
सुबक व नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी अंतस्रावी ग्रंथी