Advertisements
Advertisements
प्रश्न
वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा
उत्तर
दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला वृत्तलेख वाचला. मीना वैशंपायन यांनी लेखिका दुर्गा भागवत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर वृत्तलेख लिहिला आहे. दहा फेब्रुवारी हा दुर्गाबाई भागवतांचा जन्मदिवस. या निमित्ताने 'मुक्ता' या शीर्षकाने हा वृत्तलेख लिहिला आहे. दुर्गाबाई भागवत यांचे वैचारिक भूमिका, स्त्री सक्षमीकरणाचे विचार आणि दुर्गाबाई भागवत यांच्यातील स्त्री जाणिवांचा वेध घेणे हा वृत्तलेखाचा मध्यवर्ती विषय आहे. वृत्तलेखाचा आरंभ १९७५ च्या काळातील आणीबाणीचा संदर्भ आणि दुर्गाबाई भागवतांची परखड भूमिका या संदर्भांनी केला आहे. १९७५ ची आणीबाणी, त्याच वर्षी दुर्गाबाई भागवत यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि १९७५ ला घोषित झालेले जागतिक महिला वर्ष यांचे संदर्भ वृत्तलेखाच्या पहिल्या टप्प्यात लेखिकेने नमूद केले आहेत. हे वाचत असताना वाचक म्हणून उत्सुकता हळूहळू वाढत जाते. स्त्रीस्वातंत्र्य, सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता बद्दल दुर्गाबाई भागवतांच्या विचारांचे विश्लेषण लेखिकेने विस्तृतपणे केले आहे. स्त्री मूलतः सक्षम आहे हे सांगताना दुर्गाबाई भागवत यांनी लिहिलेल्या विद्येच्या वाटेवर' या लेखाचा संदर्भ वृत्तलेखिकेने वृत्तलेखात सोदाहरण सांगितला आहे. सदर लेखाचा व्यक्तिचित्रणात्मक या वृत्तलेख प्रकारात समावेश करता येतो. दुर्गाबाई भागवत यांच्यातील 'मुक्त स्त्रीत्वाचा दृश्य आविष्कार' संपूर्ण वृत्तलेखात लेखिकेने समर्थपणे शब्दरूपात उभा केला आहे. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप या तीन पातळ्यांवर वृत्तलेख यशस्वी होतो. वृत्तलेखाची भाषा प्रवाही आणि परिणामकारक आहे. दुर्गाबाई भागवत यांचे संयत व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर उलग दाखवण्यासाठी तेवढ्याच संयतपणे भाषेचा अवलंब केला आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक स्पष्ट करा.
वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर लिहा.
वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची गरज.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची भाषा
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची वैशिष्ट्य.
वृत्तलेखाची लेखनशैली कशी असावी? ते तुमच्या भाषेत लिहा.
वृत्तलेखाची कोणतीही पाच वैशिष्ट्ये लिहा.
त्यातील मजकूर ______ त्याची आकर्षकता ______ वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी ______ आपलीशी वाटणारी ______ कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी ______ वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी.
‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा.
‘वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते’ तुमचे मत लिहा.
व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना तयार करा.
वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा.
वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे ............. वृत्तलेखाची शैली.
वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
बातमीवर आधारित वृत्तलेख ______ व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख ______ मुलाखतीवर आधारित वृत्ललेख ______ ऐतिहासिक स्थळ ______ गूढ, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख.