मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा. वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा.

वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे ............. वृत्तलेखाची शैली.

खालील मुद्दयांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना घ्यावयाची काळजी , याबाबत सविस्तर लिहा.

वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक ............. विषयाचे वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे ............. वृत्तलेखाची शैली.

सविस्तर उत्तर

उत्तर

  1. वाचकांची अभिरुची: आपले वाचक, त्यांची गरज, अभिरुची लक्षात घेऊन वर्तमानपत्रात लेखन करावे लागते. एखादे वृत्तपत्र ग्रामीण भागात प्रकाशित होते. त्याचा वाचक कोणत्या वर्गातील आहे, त्याची गरज काय आहे हे लक्षात घेऊन विषय, भाषा, आशय, त्यांची अभिरुची इत्यादींचा विचार करून लेखन केले तरच वर्तमानपत्र वाचकांच्या हृदयावर अधिराज्य करू शकते. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार करावा लागतो.
  2. तात्कालिक महत्त्व: वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. वृत्तलेख हा विशिष्ट निमित्ताने लिहिला जातो. त्यामागे तात्कालिक कारण असेल तर वाचक तो वृत्तलेख वाचतात. त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते.
  3. वेगळेपणा: वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात घेण्याची गरज असते.
  4. वाचकांचे लक्ष वेधणे: वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते त्याच्या शेवटापर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिजे. त्यासाठी वृत्तलेख लिहिताना त्याचा एक आराखडा तयार करावा लागतो. त्यात साधारणपणे वृत्तलेखाचा विषय, त्याची मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, पोटशीर्षक, विवेचन, त्यातील चित्रे, तक्ता, आलेख, नकाशा, छायाचित्रे या सर्वांचा विचार करावा लागतो. सदर चित्रे कोठे उपलब्ध होणार आहेत, कोणाकडून काढून घ्यायची आहेत हा विचार देखील करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जितका उत्तम हवा असतो तितकीच त्याची चित्रे देखील समर्पक व चांगली असावी लागतात. कारण एक चित्र हजार शब्दांचे काम करते असे म्हणतात. त्या अर्थाने वृत्तलेखाची उंची वाढवण्याचे काम समर्पक चित्रे करत असतात. या संबंधीचे नियोजन केले आणि त्यासाठीचे कच्चे टिपण, संदर्भ तयार करून ठेवले, तर वृत्तलेख लिहिणे सुलभ होते.
  5. वृत्तलेखाची शैली: वृत्तलेखाचा प्रारंभीचा भाग बातमीसारखा असतो. वृत्तलेखाच्या पहिल्या भागात बातमीचा उलगडा झाला पाहिजे. ‘कशावरती’ आणि ‘का’ या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती प्रारंभीच्या भागात व्हावी लागते. त्यानंतर मधल्या भागात विवेचनाला संधी असते. अखेरच्या भागात समारोप करताना या वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते, याचा विचार करावा लागतो. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना भाषा सरळ, साधी व मनाला थेट भिडणारी असावी लागते. विवेचन करताना शब्दबंबाळपणा टाळावा लागतो. भाषा जड, समजण्यास कठीण असू नये. प्रदीर्घ वाक्ये नसावीत. छोटी छोटी वाक्ये असतील तर वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते. शेवटी आपण ज्या विषयासंबंधीचा वृत्तलेख लिहीत आहोत त्या विषयासंबंधीची वाचकांची जिज्ञासा शमली जात आहे ना, हे लक्षात घ्यायला हवे.
shaalaa.com
वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्‍न

वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.


बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक स्पष्ट करा.


वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर लिहा.


वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची गरज.


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाचे स्रोत.


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची भाषा


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची वैशिष्ट्य.


वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा


बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.


वृत्तलेखाची लेखनशैली कशी असावी? ते तुमच्या भाषेत लिहा.


वृत्तलेखाची कोणतीही पाच वैशिष्ट्ये लिहा.

त्यातील मजकूर ______ त्याची आकर्षकता ______ वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी ______ आपलीशी वाटणारी ______ कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी ______ वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी.


‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा.


‘वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते’ तुमचे मत लिहा.


व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना तयार करा.


वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.


वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

बातमीवर आधारित वृत्तलेख ______ व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख ______ मुलाखतीवर आधारित वृत्ललेख ______ ऐतिहासिक स्थळ ______ गूढ, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×