English

गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Questions

गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.

खालील दिलेली कृती सोडवा. 

गिरिजा कीर यांच्या 'यडबंबू ढब्बू' या बालकादंबरीचे कथानक थोडक्यात सांगून त्यातील गंमत सांगा. 

Short Answer

Solution

'बालसाहित्यिका – गिरिजा कीर' या पाठात लेखिका डॉ. विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे.

'यडबंबू ढब्बू' ही गिरिजा कीर यांची मनोरंजक बालकादंबरी आहे. या बालकादंबरीतील ढब्बू हे पात्र आईला उगाच त्रास न देणारे, आईचे आवडते व्हावे या प्रयत्नात असणारे असे पात्र आहे. होते असे, की ताईचा साखरपुडा असल्याने घरी बनवलेली मिठाई काही गरीब मुले मागू लागतात. सुरुवातीस ढब्बू नकार देतो; परंतु आई ढब्बूला त्या गरीब मुलांना मिठाई देण्यास सांगते, कोणाला दु:खी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे असे सांगते. ही गोष्ट लक्षात ठेवून आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटून टाकतो.

या कृतीतून आईने सांगितलेल्या गोष्टीचा/संस्कारांचा प्रभाव ढब्बूच्या, तसेच बालवाचकांच्याही मनावर उमटतो. अशाप्रकारे, या बालकादंबरीतील गिरिजाबाईंची लेखणी विनोदाच्या माध्यमातूनही बालमनावर संस्कार कोरते.

shaalaa.com
बालसाहित्यिका : गिरिजा कीर
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर - कृती क्रमांक १

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 5.2 बालसाहित्यिका : गिरिजा कीर
कृती क्रमांक १ | Q 3. 1.

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.

साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये


आकृती पूर्ण करा.

साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये


टिपा लिहा.

‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.


‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.


साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.


टिपा लिहा.  (३)

बालनाटिका


टिपा लिहा. (३)

साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.


टिपा लिहा. (३)

गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

'यडबंबू ढब्बू' मधील ढब्बू तुम्हांला कसा वाटतो, यावर तुमचा अभिप्राय लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

’गोष्ट एका माणसाची“ या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता, ते तुमच्या शब्दांत लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×