Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा.
Solution
आपल्या अभिनयाने रसिकमनावर राज्य करणार्या दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या 'बोक्या सातबंडे' या पुस्तकांच्या मालिका मी वाचल्या आहेत. बोक्या सातबंडे हा लेखकाचा मानलेला मुलगा! त्यांच्या कल्पनेतील पात्र. तो निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा आहे. तो व्रत्य आहे पण लबाड नाही. खोडकरपणा करतो; पण खोडसाळ नाही. त्याला एकच गोष्ट समजते ती म्हणजे गरजूला मदत करणे आणि ढोंगी माणसाच्या वर्मावर घाव घालणे. प्रत्येक संकटातून आणि अग्निदिव्यातून तो ज्याप्रकारे बाहेर पडतो ते वाचताना आपणच ते अग्निदिव्य करून सहीसलामत बाहेर पडल्याची भावना निर्माण होते.
दिलीप प्रभावळकर यांच्या मिस्कील खट्याळ लेखणीतून प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारे 'बोक्या सातबंडे' हे पुस्तक साऱ्यांनाच हसवते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.
टिपा लिहा.
‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.
‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.
गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा. (३)
बालनाटिका
टिपा लिहा. (३)
साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.
टिपा लिहा. (३)
गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
'यडबंबू ढब्बू' मधील ढब्बू तुम्हांला कसा वाटतो, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
’गोष्ट एका माणसाची“ या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता, ते तुमच्या शब्दांत लिहा.