Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
’गोष्ट एका माणसाची“ या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
'मधू' गरीब असून त्याची आई आजारी असल्यामुळे तो नाइलाजाने पाकीट मारतो. आपल्या आईच्या आजारपणावर इलाज करण्यासाठी पैसे मिळवणे हा त्याचा हेतू आहे. नंतर त्याने ज्याचे पाकीट मारले त्याची परिस्थिती वाईट असल्याचे त्याला कळते आणि तो ते पाकीट परत देण्यासाठी जातो. मी मधूच्या जागी असतो, तर पाकीट मारण्याचे किंवा चोरी करण्याचे कृत्य केलेच नसते. त्याऐवजी डॉक्टरांच्या मदतीने सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने आईचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला असता. तेही शक्य झाले नसते, तर एखादी छोटी नोकरी करून त्यातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला असता. आपण नंतर कितीही संवेदनशीलता दाखवली तरीही अगोदर केलेली चूक ही चूकच असते असे माझे मत आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.
‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.
गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा. (३)
बालनाटिका
टिपा लिहा. (३)
साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.
टिपा लिहा. (३)
गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
'यडबंबू ढब्बू' मधील ढब्बू तुम्हांला कसा वाटतो, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा.