Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)
मार्च २०२० ______ परीक्षा कालावधी ______ विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी ______ कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव ______ सामाजिक परिस्थिती ______ विद्यार्थ्यांची निराशा ______ निकाल ______ बोध.
Solution
परीक्षेची परीक्षा |
मार्च २०२० उगवला आणि परीक्षा कालावधी असल्याने सारेच तयारीला लागले. मार्च महिना म्हटला, की शाळांमध्ये सुरू असते परीक्षांची धावपळ. विद्यार्थी परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी जवळपास पूर्ण झाली. अशावेळी नेमकं जगभरातून कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या बातम्या येऊ लागल्या आणि एकामागोमाग शहर बंद झाले. कोरोना या रोगांवर कोणतेही औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरांमध्ये 'बंद' घोषित केला. मग अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्वच सेवा बंद केल्या. शाळा बंद झाल्या. सुरू असलेल्या परीक्षा थांबवण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. कोणालाही काही कळत नव्हते. सामाजिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. 'जसा पावसाळा' हा ऋतू या धर्तीवर नियमित येतो 'तसेच नियमित येती परीक्षा' असे समजून परीक्षा देणाऱ्या आणि त्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा झाली. अनेक विद्यार्थी खूश होते. काही जणांची परीक्षा झाली, तर काही जण परीक्षेची वाट पाहत राहिले. कोरोनाने जणू परीक्षेची परीक्षा घेतली होती. विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली होती. आपण पास होणार की नापास? आपल्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार, की नाही या चिंतेत सारा विद्यार्थीवर्ग होता. अशातच निकाल जाहिर झाले. न झालेल्या विषयांच्या पेपरचे गुण सरासरी गुणांच्या आधारे देऊन निकाल देण्यात आला होता. अनेकांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. जवळपास सारे विद्यार्थी आनंदीत होते. काहीजणांना, तर परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात संधी मिळाली होती. या साऱ्या परिस्थितीचा सामना केल्यावर एका गोष्टीचा बोध झाला, की निसर्गापुढे माणूस अगदी शून्य आहे. निसर्ग ही मानवाची निर्मिती नाही, तर मानव हा निसर्गाची निर्मिती आहे, मानवाला आपले स्थान या निसर्गाने दाखवून दिले. निसर्गावर विजय मिळवू पाहणाऱ्या माणसाला त्याने वठणीवर आणले. तात्पर्य: निसर्गापुढे मानव शून्य आहे, त्याचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मानवाचा विनाश पक्का आहे. |
RELATED QUESTIONS
खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.
दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि .... |
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.
आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –
खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)
लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.
खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)
गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.
खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)
जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.
खालील कथालेखन करा.
महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.
खालील कथालेखन करा.
रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.
खालील कथालेखन करा.
रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.
खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि...
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
एकीचे बळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
ऐकावे जनाचे करावे मनाचे
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कष्टाची गोड फळे
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
प्रामाणिकपणाचे फळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
बुद्धी आणि ताकदीचा मेळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
पळसाला पाने तीनच
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
अति तिथं माती
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:
एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.
खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.
मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
तळेगाव गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची थोडीफार शेती होती व शेतीसाठी दोन बैलही त्याच्यापाशी होते. एक ढवळ्या व दुसरा पवळ्या अशी त्यांची नावे होती. त्यांची चांगली मैत्री होती. शेतात काम करायला ते एकत्र जात व एकत्रच परत येत पण एके दिवशी ________ |
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
आटपाट नगर - वृद्ध शेतकरी - आंब्याची रोपे - बागेत काम - राजा हिंडत बागेत - राजाची चौकशी - रोपे लावून फळे केव्हा - शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आश्चर्य - शेतकऱ्याला बक्षीस.
खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.
हट्टी राजकन्या | त्याला अर्धे राज्य मिळते |
`↓` | `↑` |
राज्यकन्येची अट | शेतकऱ्याचा मुलगा येतो |
`↓` | `↑` |
न संपणारी गोष्ट सांगणे | बरेच जण प्रयत्न करतात |
`↓` | `↑` |
राज्यात दवंडी अर्धे राज्य |
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
मुद्दे: अनाथ मुलगा – रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत – रस्त्यात एक पाकीट मिळते – वर्गशिक्षकांकडे देणे – पाकिटावरील पत्यावरून योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.
दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा.
____________________________________________________________ ____________________________________________________________ ____________________________________________________________ ____________ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता. |
तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या याची यादी करा.
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
- कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा:
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)
शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटीत्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि ... |