Advertisements
Advertisements
Question
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
Solution
'सखू आजी' हा पाठ अभ्यासताना मलाही माझी आजी डोळ्यांसमोर येत होती, कारण सखू आजी व माझ्या आजीच्या स्वभावात मला काही साम्य आढळून आले. माझी आजी गावात एकटीच राहते. या वयातही तिचा कामातील उत्साह आश्चर्यचकित करणारा आहे. नवनवीन गोष्टी शिकण्यात माझी आजी सखू आजीसारखीच उत्साही आहे. एकटी राहत असल्याने आम्ही सर्वांनी तिला मोबाइल घेऊन दिला. सुरुवातीला वाटले, की केवळ आलेला फोन जरी तिने उचलला तरी खूप झाले; परंतु अगदी काही दिवसांतच आजी मोबाइलवरून फोन करणे व फोन घेणे या दोन्ही गोष्टी शिकली. एवढंच नव्हे, तर नवीन संपर्कक्रमांकही संग्रहित करू लागली. नव्या काळाची पावले ओळखून ती मोबाइल सफाईने हाताळायला शिकली.
आजी म्हणजे गोष्टींचा खजिना आहे. सखू आजीप्रमाणेच माझ्या आजीलाही लहान मुलांना गोष्टी सांगायला आवडते. आम्ही भावंडं गावी गेल्यावर आजीच्या गोष्टी ऐकूनच झोपतो. ती मुलींना उच्चशिक्षण द्यावे, स्वत:च्या पायावर उभे राहून त्यांनी उच्चपदी कार्य करावे या मताची आहे. सखू आजीप्रमाणेच माझ्याही आजीला गावात मान आहे. तिच्याही निर्णयाचा गावकरी आदर करतात. ती जरी एकटी राहत असली तरी एकटेपणाची जाणीव तिला होत नाही, कारण सखू आजीप्रमाणे संपूर्ण गावच तिचे कुटुंब आहे. अशाप्रकारे, सखू आजी आणि माझी आजी मला अनेक बाबतींत सारख्या वाटतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृतिबंध पूर्ण करा.
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
फुकट -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
चूक की बरोबर ते लिहा.
इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
हिरमुसले होणे |