Advertisements
Advertisements
Question
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
Solution
पक्षी आणि मानव यांच्या जीवनपद्धतीत बरेचसे साम्य दिसून येते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्याचप्रमाणे पक्षीही थव्याने उडतात. ज्याप्रमाणे मानव आपल्या कुटुंबात राहणे पसंत करतो, तसेच पक्षीही घरट्यांमध्ये कुटुंबासह राहतात. मानवाच्या कुटुंबात जसे माता-पिता, लहान मुले असतात, त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्येही नर-मादी, पिल्ले असतात. मानवाच्या कुटुंबात माता-पिता कुटुंबाची जबाबदारी घेतात, त्यांचे संरक्षण करतात, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुख्य गरजा पूर्ण करतात. त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्येही नर व मादी आपल्या कुटुंबाच्या अन्नाची व निवाऱ्याची गरज पूर्ण करतात. पिल्लांना सुरक्षित वातावरण देतात.
बदलत्या ऋतूमध्ये पिल्लांना नुकसान पोहोचू नये, म्हणून अनेक पक्षी-पक्षीण स्थलांतरही करतात. मानवही आपल्या कुटुंबियांच्या सोईनुसार, परिस्थितीनुसार स्थलांतर करतात. पक्ष्यांमध्ये पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना घरटे सोडावे लागते, तसेच मानवामध्येही मुले मोठी झाल्यावर आपल्या पुढील आयुष्यासाठी प्रसंगी घरापासून दूर होतात; मात्र ती आयुष्यभर आपल्या आई- वडिलांशी संबंधित राहतात. अशाप्रकारे, पक्षी व मानव हे दोघे कुटुंबवत्सल सजीव आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
(१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
(२) | अक्षरशत्रू कुलूप | |
(३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
(४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
चौकट पूर्ण करा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
जीवनदायी झाड-
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
चूक की बरोबर ते लिहा.
इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
हिरमुसले होणे |
फरक स्पष्ट करा.