English

Balbharati solutions for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board chapter 7 - सांख्यिकी [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board chapter 7 - सांख्यिकी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 7: सांख्यिकी

Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board.


सरावसंच 7.1सरावसंच 7.2सरावसंच 7.3सरावसंच 7.4सरावसंच 7.5संकीर्ण प्रश्नसंग्रह 7
सरावसंच 7.1 [Page 111]

Balbharati solutions for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board 7 सांख्यिकी सरावसंच 7.1 [Page 111]

सरावसंच 7.1 | Q (1) | Page 111

खालील सारणीमध्ये भारतातील ट्रक व बस यांची जवळच्या पूर्ण लाखांतील संख्या खाली दिली आहे. त्यावरून शतमान स्तंभालेख काढा. (शतमाने जवळच्या पूर्णांकापर्यंत घ्या.)

वर्ष ट्रकची संख्या बसची संख्या
2006-2007 47 9
2007-2008 56 13
2008-2009 60 16
2009-2010 63 18
सरावसंच 7.1 | Q (2) | Page 111

खालील सारणीमध्ये भारतातील पक्क्या रस्त्यांची व कच्च्या रस्त्यांची माहिती दिली आहे. त्यावरून विभाजित व शतमान स्तंभालेख काढा. (शतमाने जवळच्या पूर्णांकापर्यंत घ्या.)

वर्षे पक्के रस्ते (लक्ष किमी) कच्चे रस्ते (लक्ष किमी)
2000-2001 14 10
2001-2002 15 11
2002-2003 17 13
2003-2004 20 19
सरावसंच 7.2 [Page 113]

Balbharati solutions for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board 7 सांख्यिकी सरावसंच 7.2 [Page 113]

सरावसंच 7.2 | Q (1) (i) | Page 113

खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा.

प्रत्यक्ष वर्गात जाऊन शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरीची माहिती गोळा केली.

सरावसंच 7.2 | Q (1) (ii) | Page 113

खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या उंचीची माहिती वरिष्ठ कार्यालयास तातडीने पाठवायची असल्याने शाळेतील शारीरिक शिक्षण विभागातील नोंदींवरून माहिती गोळा केली.

सरावसंच 7.2 | Q (1) (iii) | Page 113

खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा.

नांदपूर येथील प्रत्येक कुटुंबातील शालाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती प्रत्यक्ष घरी जाऊन गोळा केली.

सरावसंच 7.2 | Q (1) (iv) | Page 113

खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा.

विज्ञान प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जंगलात जाऊन झाडांची पाहणी करून माहिती गोळा केली.

सरावसंच 7.3 [Pages 118 - 119]

Balbharati solutions for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board 7 सांख्यिकी सरावसंच 7.3 [Pages 118 - 119]

सरावसंच 7.3 | Q (1) | Page 118

20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा.

सरावसंच 7.3 | Q (2) | Page 118

35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढा.

सरावसंच 7.3 | Q (3) | Page 118

एका वर्गाचा मध्य 10 असून वर्गअवकाश 6 आहे, तर ताे वर्ग कोणता?

सरावसंच 7.3 | Q (4) | Page 118

खालील सारणी पूर्ण करा.

वर्ग (वय वर्षे) ताळ्याच्या खुणा वारंवारता (f) (विद्यार्थी संख्या)
12-13 `cancel(bb|bb|bb|bb|)` `square`
13-14 `cancel(bb|bb|bb|bb|)` `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|bb|bb|bb|` `square`
14-15 `square` `square`
15-16 `bb|bb|bb|bb|` `square`
    N = ∑f = 35
सरावसंच 7.3 | Q (5) | Page 118

एका शाळेच्या हरितसेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या खाली दिली आहे.

3, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 3, 5, 4, 7, 5 , 3, 6, 6, 5, 3, 4, 5, 7, 3, 5, 6, 4, 4, 3, 5, 6, 6, 4, 3, 5, 7, 3, 4, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 4, 7.

यावरून अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.

सरावसंच 7.3 | Q (6) | Page 118

π ची 50 दशांश स्थळांपर्यंत किंमत खाली दिलेली आहे. 3.14159265358979323846264338327950288419716939937510

यावरून दशांश चिन्हानंतरच्या अंकांची अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.

सरावसंच 7.3 | Q (7) (i) | Page 119

खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.

वर्गमध्य वारंवारता
5 3
15 9
25 15
35 13
सरावसंच 7.3 | Q (7) (ii) | Page 119

खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.

वर्गमध्य वारंवारता
22 6
24 7
26 13
28 4
सरावसंच 7.3 | Q (8) | Page 119

एका शाळेतील इयत्ता 9 वीच्या 46 विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपासमधील पेन्सिलींची लांबी मोजावयास सांगितली. ती सेंटिमीटरमध्ये खालीलप्रमाणे आहे.

16, 15, 7, 4.5, 8.5, 5.5, 5, 6.5, 6, 10, 12, 13, 4.5, 4.9, 16, 11, 9.2, 7.3, 11.4, 12.7, 13.9, 16, 5.5, 9.9, 8.4, 11.4, 13.1, 15, 4.8, 10, 7.5, 8.5, 6.5, 7.2, 4.5, 5.7, 16, 5.7, 6.9, 8.9, 9.2, 10.2, 12.3, 13.7, 14.5, 10.

0 − 5, 5 − 10, 10 − 15, ..... याप्रमाणे वर्ग घेऊन असमावेशक पद्धतीने वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.

सरावसंच 7.3 | Q (9) | Page 119

एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लीटर दूध जमा केले आहे त्याची माहिती खाली दिली आहे.

27, 75, 5, 99, 70, 12, 15, 20, 30, 35, 45, 80, 77, 90, 92, 72, 4, 33, 22, 15, 20, 28, 29, 14, 16, 20, 72, 81, 85, 10, 16, 9, 25, 23, 26, 46, 55, 56, 66, 67, 51, 57, 44, 43, 6, 65, 42, 36, 7, 35.

योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.

सरावसंच 7.3 | Q (10) | Page 119

एका संस्थेला ‘दिव्यांग विकास निधी’ साठी गावातील 38 लोकांनी प्रत्येकी काही रुपये दिले, ही माहिती खाली दिली आहे.

101, 500, 401, 201, 301, 160, 210, 125, 175, 190, 450, 151, 101, 351, 251, 451, 151, 260, 360, 410, 150, 125, 161, 195, 351, 170, 225, 260, 290, 310, 360, 425, 420, 100, 105, 170, 250, 100

  1. 100 − 149, 150 − 199, 200 − 249, ... असे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
  2. सारणीवरून 350 रुपये व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या किती आहे हे लिहा.
सरावसंच 7.4 [Pages 121 - 122]

Balbharati solutions for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board 7 सांख्यिकी सरावसंच 7.4 [Pages 121 - 122]

सरावसंच 7.4 | Q (1) | Page 121

खालील संचित वारंवारता सारणी पूर्ण करा.

वर्ग (उंची – सेमी मध्ये) वारंवारता (विद्यार्थी संख्या) पेक्षा कमी संचित वारंवारता
150 − 153 05 05
153 − 156 07 05 + `square` = `square`
156 − 159 15 `square` + 15 = `square`
159 − 162 10 `square` + `square` = 37
162 − 165 05 37 + 5 = 42
165 − 168 03 `square` + `square` = 45 
  एकूण N = 45   
सरावसंच 7.4 | Q (2) | Page 122

खालील संचित वारंवारता सारणी पूर्ण करा.

वर्ग (मासिक उत्पन्न रुपये)

वारंवारता (व्यक्तींची संख्या)

पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता
1000 − 5000 45 ______
5000 − 10000 19 ______
10000 − 15000 16 ______
15000 − 20000 02 ______
20000 − 25000 05 ______
  एकूण N = 87  
सरावसंच 7.4 | Q (3) | Page 122

एका वर्गातील 62 विद्यार्थ्यांना गणित विषयात 100 पैकी मिळालेले गुण खाली दिले आहेत. 0 − 10, 10 − 20 ..... हे वर्ग घेऊन वारंवारता सारणी आणि संचित वारंवारता सारणी (पेक्षा जास्त) तयार करा.

55, 60, 81, 90, 45, 65, 45, 52, 30, 85, 20, 10, 75, 95, 09, 20, 25, 39, 45, 50, 78, 70, 46, 64, 42, 58, 31, 82, 27, 11, 78, 97, 07, 22, 27, 36, 35, 40, 75, 80, 47, 69, 48, 59, 32, 83, 23, 17, 77, 45, 05, 23, 37, 38, 35, 25, 46, 57, 68, 45, 47, 49.

तयार केलेल्या सारणीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. 40 किंवा 40 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
  2. 90 किंवा 90 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
  3. 60 किंवा 60 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
  4. 0 − 10 या वर्गाची पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता किती?
सरावसंच 7.4 | Q (4) | Page 122

एका वर्गातील 62 विद्यार्थ्यांना गणित विषयात 100 पैकी मिळालेले गुण खाली दिले आहेत. 0 − 10, 10 − 20 ..... हे वर्ग घेऊन वारंवारता सारणी आणि पेक्षा कमी संचित वारंवारता सारणी तयार करा यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

55, 60, 81, 90, 45, 65, 45, 52, 30, 85, 20, 10, 75, 95, 09, 20, 25, 39, 45, 50, 78, 70, 46, 64, 42, 58, 31, 82, 27, 11, 78, 97, 07, 22, 27, 36, 35, 40, 75, 80, 47, 69, 48, 59, 32, 83, 23, 17, 77, 45, 05, 23, 37, 38, 35, 25, 46, 57, 68, 45, 47, 49

  1. 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
  2. 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
  3. 60 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
  4. 50 − 60 या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता किती?
सरावसंच 7.5 [Page 125]

Balbharati solutions for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board 7 सांख्यिकी सरावसंच 7.5 [Page 125]

सरावसंच 7.5 | Q (1) | Page 125

मुकुंदचे 7 वर्षांचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये 10, 7, 5, 3, 9, 6, 9 असे आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा.

सरावसंच 7.5 | Q (2) | Page 125

दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा. 59, 75, 68, 70, 74, 75, 80.

सरावसंच 7.5 | Q (3) | Page 125

गणिताच्या गृहपाठांत 7 विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी गुण खालीलप्रमाणे आहेत.

99, 100, 95, 100, 100, 80, 90 यावरून मिळालेल्या गुणांचे बहुलक काढा.

सरावसंच 7.5 | Q (4) | Page 125

एका कारखान्यातील 30 कामगारांना मिळत असलेला मासिक पगार रुपयांमध्ये खालीलप्रमाणे आहे.

5000, 7000, 3000, 4000, 4000, 3000, 3000, 3000, 8000, 4000, 4000, 9000, 3000, 5000, 5000, 4000, 4000, 3000, 5000, 5000, 6000, 8000, 3000, 3000, 6000, 7000, 7000, 6000, 6000, 4000

यावरून कामगारांचा मासिक पगाराचा मध्य काढा.

सरावसंच 7.5 | Q (5) | Page 125

एका टोपलीतील 10 टोमॅटोंचे वजन ग्रॅममध्ये प्रत्येकी 60, 70, 90, 95, 50, 65,70, 80, 85, 95 अशी आहेत. यावरून टोमॅटोंच्या वजनांचा मध्यक काढा.

सरावसंच 7.5 | Q (6) | Page 125

एका हॉकी खेळाडूने 9 सामन्यांत केलेले गोल खालीलप्रमाणे आहेत.

5, 4, 0, 2, 2, 4, 4, 3, 3 यावरून मध्य, मध्यक व बहुलक काढा.

सरावसंच 7.5 | Q (7) | Page 125

50 प्राप्तांकांचा मध्य 80 आला. परंतु यांतील 19 हा प्राप्तांक चुकून 91 घेण्यात आला असे नंतर लक्षात आले, तर दुरुस्तीनंतरचा मध्य किती?

सरावसंच 7.5 | Q (8) | Page 125

येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत, 2, 3, 5, 9, x + 1, x + 3, 14, 16, 19, 20 जर त्यांचा मध्यक 11 आहे तर x ची किंमत काढा.

सरावसंच 7.5 | Q (9) | Page 125

35 प्राप्तांकांचा मध्य 20 आहे. यांपैकी पहिल्या 18 प्राप्तांकांचा मध्य 15 व शेवटच्या 18 प्राप्तांकांचा मध्य 25 असेल तर 18 वा प्राप्तांक काढा.

सरावसंच 7.5 | Q (10) | Page 125

पाच प्राप्तांकांचा मध्य 50 आहे. यांपैकी एक प्राप्तांक कमी झाल्यास मध्य 45 होतो, तर तो प्राप्तांक कोणता?

सरावसंच 7.5 | Q (11) | Page 125

एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांपैकी 15 मुलगे आहेत. एका परीक्षेत मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य 33 व मुलींच्या गुणांचा मध्य 35 आहे यावरून वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य काढा.

सरावसंच 7.5 | Q (12) | Page 125

10 व़िदयार्थ्यांची किलोग्रॅममधील वजने खालीलप्रमाणे आहेत. 40, 35, 42, 43, 37, 35, 37, 37, 42, 37 यावरून बहुलक काढा.

सरावसंच 7.5 | Q (13) | Page 125

खालील सारणीत काही कुटुंबांतील 14 वर्षांखालील अपत्यांची संख्या दर्शवली आहे. यावरून 14 वर्षाखालील अपत्यांच्या संख्यांचा बहुलक काढा.

अपत्यांची संख्या 1 2 3 4
कुटुंबे (वारंवारता) 15 25 5 5
सरावसंच 7.5 | Q (14) | Page 125

खालील सामग्रीचा बहुलक काढा.

प्राप्तांक (गुण) 35 36 37 38 39 40
प्राप्तांक (गुण) 09 07 09 04 04 02
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [Pages 126 - 128]

Balbharati solutions for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board 7 सांख्यिकी संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [Pages 126 - 128]

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (1) (i) | Page 126

खालीलपैकी कोणती सामग्री प्राथमिक सामग्री नाही?

  • वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या हजेरीची माहिती गोळा केली.

  • प्रत्यक्ष भेट देऊन घरातील व्यक्तींच्या संख्येची माहिती गोळा केली.

  • तलाठ्याकडे जाऊन गावातील प्रत्येक शेतकऱ्याचे सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्र नोंदवले.

  • प्रत्यक्ष पाहणी करून नाल्यांच्या स्वच्छतेची माहिती घेतली.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (1) (ii) | Page 126

25 − 35 ह्या वर्गाची वरची वर्गामर्यादा कोणती?

  • 25

  • 35

  • 60

  • 30

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (1) (iii) | Page 126

25 − 35 ह्या वर्गाचा वर्गमध्य कोणता?

  • 25

  • 35

  • 60

  • 30

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (1) (iv) | Page 126

0 − 10, 10 − 20, 20 − 30.... असे वर्ग असणाऱ्या वारंवारता सारणीत 10 हा प्रप्तांक कोणत्या वर्गात समाविष्ट करावा?

  • 0 − 10

  • 10 − 20

  • 0 − 10 व 10 − 20 ह्या दोन्ही वर्गांत

  • 20 − 30

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (1) (v) | Page 126

जर `barx` हा x1, x2 ............xn आणि `bary` हा y1, y2, ……….yn चा मध्य असेल आणि `barz` हा x1, x2 ............xn, y1, y2, ……….yn यांचा मध्य असेल तर `barz` = ?

  • `(barx+ bary)/2`

  • `barx+ bary`

  • `(barx+ bary)/n`

  • `(barx+ bary)/(2n)`

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (1) (vi) | Page 126

पाच संख्यांचा मध्य 50 असून त्यांतील 4 संख्यांचा मध्य 46 आहे, तर पाचवी संख्या कोणती?

  • 4

  • 20

  • 434

  • 66

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (1) (vii) | Page 126

100 प्राप्तांकांचा मध्य 40 आहे. जर त्यांतील 9 वा प्राप्तांक 30 आहे. त्याच्या जागी 70 घेतले व उरलेले प्राप्तांक तसेच ठेवले तर नवीन मध्य काेणता आहे?

  • 40.6

  • 40.4

  • 40.3

  • 40.7

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (1) (viii) | Page 126

19, 19, 15, 20, 25, 15, 20, 15 ह्या सामग्रीचा बहुलक कोणता?

  • 15

  • 20

  • 19

  • 25

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (1) (ix) | Page 127

7, 10, 7, 5, 9, 10 ह्या सामग्रीचा मध्यक कोणता?

  • 7

  • 9

  • 8

  • 10

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (1) (x) | Page 127

खालील सारणीनुसार 30 − 40 ह्या वर्गाची वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता किती?

वर्ग 0 −10 10 − 20 20 − 30 30 − 40 40 − 50
वारंवारता 7 3 12 13 2
  • 13

  • 15

  • 35

  • 22

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (2) | Page 127

20 कर्मचाऱ्यांच्या पगारांचा मध्य 10,250 रुपये आहे. जर त्यामध्ये कार्यालय प्रमुखाचा पगार मिळवला तर मध्य 750 रुपयांनी वाढतो, तर कार्यालय प्रमुखाचा पगार काढा.

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (3) | Page 127

नऊ संख्यांचा मध्य 77 आहे, जर त्यांच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता मध्य 5 ने वाढतो, तर मिळवलेली संख्या कोणती?

संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (4) | Page 127

एका शहराचे एका महिन्याचे दररोजचे कमाल तापमान सेल्सिअस अंशांमध्ये खालीलप्रमाणे आहे. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी (सलग वर्ग) तयार करा.

29.2, 29.0, 28.1, 28.5, 32.9, 29.2, 34.2, 36.8, 32.0, 31.0, 30.5, 30.0, 33, 32.5, 35.5, 34.0, 32.9, 31.5, 30.3, 31.4, 30.3, 34.7, 35.0, 32.5, 33.5, 29.0, 29.5, 29.9, 33.2, 30.2

सारणीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. कमाल तापमान 34°c पेक्षा कमी असणारे दिवस किती?
  2. कमाल तापमान 34°c किंवा त्यापेक्षा जास्त असणारे दिवस किती?
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (5) | Page 127

जर खालील प्राप्तांकांचा मध्य 20.2 असेल तर p ची किंमत काढा.

xi 10 15 20 25 30
fi 6 8 p 10 6
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (6) | Page 127

मॉडेल हायस्कूल नांदपूर येथील इयत्ता 9 वीच्या 68 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत गणितात 80 पैकी मिळवलेले गुण खाली दिले आहेत.

70, 50, 60, 66, 45, 46, 38, 30, 40, 47, 56, 68, 80, 79, 39, 43, 57, 61, 51, 32, 42, 43, 75, 43, 36, 37, 61, 71, 32, 40, 45, 32, 36, 42, 43, 55, 56, 62, 66, 72, 73, 78, 36, 46, 47, 52, 68, 78, 80, 49, 59, 69, 65, 35, 46, 56, 57, 60, 36, 37, 45, 42, 70, 37, 45, 66, 56, 47.

30 − 40, 40 − 50 ...... हे वर्ग घेऊन वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता सारणी तयार करा. त्या सारणीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. 80 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
  2. 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
  3. 60 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (7) | Page 128

मॉडेल हायस्कूल नांदपूर येथील इयत्ता 9 वीच्या 68 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत गणितात 80 पैकी मिळवलेले गुण खाली दिले आहेत.

70, 50, 60, 66, 45, 46, 38, 30, 40, 47, 56, 68, 80, 79, 39, 43, 57, 61, 51, 32, 42, 43, 75, 43, 36, 37, 61, 71, 32, 40, 45, 32, 36, 42, 43, 55, 56, 62, 66, 72, 73, 78, 36, 46, 47, 52, 68, 78, 80, 49, 59, 69, 65, 35, 46, 56, 57, 60, 36, 37, 45, 42, 70, 37, 45, 66, 56, 47.

30 − 40, 40 − 50..... असे वर्ग घेऊन खालच्या वर्ग मर्यादेपेक्षा जास्त संचित वारंवारता सारणी तयार करा. यावरून

  1. 70 किंवा 70 पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
  2. 30 किंवा 30 पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (8) | Page 128

खालील 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत.

45, 47, 50, 52, x, x + 2, 60, 62, 63, 74 यांचा मध्यक 53 आहे. यावरून x ची किंमत काढा. तसेच दिलेल्या सामग्रीचा मध्य व बहुलक काढा.

Solutions for 7: सांख्यिकी

सरावसंच 7.1सरावसंच 7.2सरावसंच 7.3सरावसंच 7.4सरावसंच 7.5संकीर्ण प्रश्नसंग्रह 7
Balbharati solutions for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board chapter 7 - सांख्यिकी - Shaalaa.com

Balbharati solutions for Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board chapter 7 - सांख्यिकी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board Maharashtra State Board 7 (सांख्यिकी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board chapter 7 सांख्यिकी are जोडस्तंभालेख, माहितीचे संकलन, विभाजित स्तंभालेख, शतमान स्तंभालेख, सांख्यिकी, सामग्रीचे संघटना, वारंवारता वितरण सारणी, संचित वारंवारता सारणी, केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे, मध्य, मध्यक, बहुलक.

Using Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board solutions सांख्यिकी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 7, सांख्यिकी Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board additional questions for Mathematics Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×