Advertisements
Advertisements
प्रश्न
‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.
उत्तर
प्रस्तुत ओळी 'पुन्हा एकदा' ह्या कवयित्री प्रतिमा इंगोले यांच्या कवितेतील आहेत. नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या स्थितीचे वर्णन येथे केले आहे.
पुन्हा एकदा पावसाच्या सरी बेभान होऊन कोसळाव्यात. त्यामुळे मातीत माती एकरूप व्हावी. याचाच अर्थ, समाजातील सारे भेदभाव मिटून जावेत. धर्म, जाती, पंथ, भाषा यांवरून असणारी माणसामाणसांतील असमानता नष्ट व्हावी. समाजात एकता नांदावी, म्हणून 'मातीत माती व्हावी एक' असे कवयित्री म्हणते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
अ.क्र. | वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
(१) | चकोर | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन | |
(२) | माहेरचे बोलावणे येणे | ||
(३) | भुकेलेले बाळ | ||
(४) | पांडुरंगाची |
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -
व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
घटक | त्यांचे सजणे |
(१) लिंबोणी | |
(२) नागफणी | |
(३) घाणेरी | |
(४) पळसफुले |
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
(२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
(४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
(५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक | कवितेतील नैसर्गिक घटना |
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.