Advertisements
Advertisements
प्रश्न
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांनी महाराष्ट्राला एक आध्यात्मिक, वैचारिक बैठक घालून दिली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेत बंदिस्त असलेली भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. भक्तीचा मार्ग सर्वांना मोकळा केला. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी सामाजिक विषमता, अंधश्रद्धा या विषयांवर समाजाला आपल्या कृती व उक्तीतून मार्गदर्शन केले, सामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. यामुळे जात, धर्म यांची बंधने गळून पडली व स्त्री, शूद्र, दलित आणि अठरापगड जातींतील भक्तांची मंदियाळी तयार झाली. गोरा कुंभार, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार यांसारख्या संतांनी स्वकर्म सांभाळून भक्ती केली. लोकांना आपल्या रोजच्या कर्मात भगवंत पाहण्याची शिकवण दिली. संत रामदासांनी स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी लोकांची मने घडवली.
संतांनी नेहमीच समाजातील सद्गुणांची पाठराखण करत वाईट वृत्तींचा नाश व्हावा यासाठी जनजागृती केली. आपले अनुभव समाजाला कथन केले व जीवनाचे सार कशात आहे, हे समजावले. अशाप्रकारे, संतांनी समाजाची गरज जाणून कार्य केले, जे नेहमी समाजाकरता मार्गदर्शक ठरले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
चौकटी पूर्ण करा.
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पाराबती करते त्या दोन कृती-
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.