Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जीवनज्योती विद्यालय, नांदगाव प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू संपर्क – [email protected] दीपक/दीपाली माने |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा. |
उत्तर
दिनांक : १७ जुलै, २०२०
प्रति,
माननीय श्री. उत्तम कांबळे
२१५, स्वरा सोसायटी,
अगरवाल नगर,
महाड, रायगड - 400562
[email protected]
विषय: 'जीवनज्योती विद्यालयाच्या' कथाकथन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याबाबत.
माननीय महोदय,
मी दीपक माने, जीवनज्योती विद्यालय, नांदगावचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे. दरवर्षी आमच्या शाळेमध्ये कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षपद आपण भूषवावे अशी आम्हां सर्वांची इच्छा आहे. आम्हां विद्यार्थ्यांना तुमचे विचार ऐकण्याची व मार्गदर्शन मिळवण्याची संधी यामुळे मिळेल.
तरी दिनांक २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या या समारंभास आपण अध्यक्ष म्हणून उपस्थित राहावे, अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण या समारंभास उपस्थित राहून विजेत्यांना व आम्हां सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल असा आम्हांला विश्वास वाटतो.
धन्यवाद!
आपला कृपाभिलाषी,
दीपक माने
जीवनज्योती विद्यालय,
नांदगाव, रत्नागिरी - 20486
[email protected]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जीवनज्योती विद्यालय, नांदगाव प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू संपर्क – [email protected] दीपक/दीपाली माने |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सुहास/सुनीता देसाई, यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने स्पर्धेत इ. 10वीं - अ या वर्गातील वीस विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मा. मुख्याध्यापकांना लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
‘स्वच्छता हीच देशसेवा’ स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता शालेय परिसर स्वच्छता |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
‘स्वच्छता हीच देशसेवा’ स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता शालेय परिसर स्वच्छता |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!
|
सहल प्रमुख या नात्याने |
तुमच्या शाळेला परवानगी मिळण्याबाबत पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!
|
सहल प्रमुख या नात्याने |
तुमच्या मित्रास वस्तुसंग्रहालय पाहण्यास येण्यासाठी पत्र लिहा. |
![]() |
“आरोग्यम् धनसंपदा” टिळक स्पोर्ट्स ४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३० |
![]() |
||
सेल | सेल | सेल | ||
खेळ सात दिवस चालू |
आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच. आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते. भरपूर स्टॉक! वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत |
![]() |
||
अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने | ||||
आपल्या मित्राला क्लबचे सामने पाहण्यासाठी येण्याबाबत पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
स्थळ गोखले नाट्यगृह, |
रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक नाट्य स्पर्धा दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८ वेळ - रात्री: ९:३० ते १२:३० प्रवेश - फक्त पासधारक* नियम व अटी लागू. |
नावनोंदणी |
तुमच्या नाटकासाठी | ||
वरील स्पर्धेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
स्थळ गोखले नाट्यगृह, |
रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक नाट्य स्पर्धा दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८ वेळ - रात्री: ९:३० ते १२:३० प्रवेश - फक्त पासधारक* नियम व अटी लागू. |
नावनोंदणी |
तुमच्या नाटकासाठी | ||
तुमच्या मित्राला तुमचे नाटक पाहण्यास येण्याबाबत पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय, अहमदनगर. E-mail - [email protected] मोबाइल - 0211556680 |
अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने साफल्य बुक डेपोकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा.
स्वपरिचय पत्राचे मुद्दे
(१) संपूर्ण नाव
(२) पत्ता
(३) संपर्क क्रमांक
(४) जन्मतारीख
(५) उंची, वजन
(६) शैक्षणिक पात्रता
(७) इतर आवडणारे खेळ
(८) पूर्वी प्राप्त केलेले यश
तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष आढळल्या, याविषयी तक्रार करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.
'झाडे लावा........ झाडे जगवा. ' हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे [email protected] |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.
योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.