Advertisements
Advertisements
Question
खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।
Solution
'स्वप्न करू साकार' या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेत कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
वरील ओळीतून कवी एकजुटीचे व नव्या पिढीच्या कर्तृत्वाचे सामर्थ्य सांगू पाहत आहे. संख्येने अनेक असलो तरी आम्हां सर्व देशवासियांच्या मनगटांत एकीची शक्ती सामावली आहे. या शक्तीच्या बळावर आम्ही विजय मिळवत पुढे पुढे जात आहोत. येणारी नवी पिढीदेखील या देशाच्या उज्ज्वल भविष्याकरता उमेदीने, उत्साहाने कार्य करणारी अशी घडेल. घराघरांतून जन्मणारे प्रत्येक मूल तेजस्वी असेल. प्रत्येक घरात जणू तेजच नवा अवतार धारण करेल, अशी अनोखी कल्पना कवी करत आहे. या तेजस्वी पिढीमुळे देशाचे भवितव्य घडणार आहे, तिचे सामर्थ्य प्रस्तुत काव्यपंक्तीद्वारे कवीला मांडायचे आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.
श्रमशक्तीचे मंत्र-
खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.
हस्त शुभंकर -
खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार-
आकृतिबंध पूर्ण करा.
कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.
पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)
आकलन कृती
१. जोड्या जुळवा. (०२)
क्र. | 'अ' | 'ब' |
१. | सुदर्शन चक्र | शुभंकर |
२. | मंत्र | शक्ती |
३. | नौबत | चैतन्य |
४. | हस्त | श्रमशक्ती |
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।। फुलामुलांतून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तनमन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।। या हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाचे चक्र चालते आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।। हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीचीही झडते नौबत घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।। या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा हस्त शुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।। |
२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
१. कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे?
२. शेतातील धान्याला कशाची उपमा दिली आहे?
३. कवितेत आलेल्या खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)
१. मंगल -
२. तन -
३. ललकार -
४. विभव -
४. खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा. (०२)
या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।
कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।। फुलामुलांतून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तनमन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।। या हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाचे चक्र चालते आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।। हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीचीही झडते नौबत घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।। या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा हस्त शुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।। |
१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)
२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)
३. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. (०२)
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।
४. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)
५. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे- (०२)
६. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. (०२)
१. चैतन्य
२. श्रम
३. उद्योग
४. उत्क्रांती
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘फुलामुलांतून हसतो श्रावण। मातीचे हो मंगल तनमन।।’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) संपदा - |
(ii) बळकट - | |
(iii) उत्क्रांती - | |
(iv) चैतन्य - |
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) शुभंकर - |
(ii) उज्जवल - | |
(iii) विभव - | |
(iv) अमुचा - |
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- शक्तीचीही झडते - ______
- चैतन्याचे फिरे - ______
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार फुलामुलांतून हसतो श्रावण या हातांनी यंत्र डोलते हजार आम्ही एकी बळकट या विश्वाची विभव संपदा |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- बळकट -
- आभाळ -
- संपदा -
- अपरंपार -
४. काव्यसौंदर्य: (2)
‘घराघरांतून जन्म घेतले तेज नवा अवतार।’ या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.